loader
Breaking News
Breaking News
Foto

मुचकुंदी नदीच्या पात्रात रंगली पोहण्याची चुरस; 'श्रीराम जन्मोत्सव' निमित्त जलतरण स्पर्धेला मोठा प्रतिसाद

गावडे आंबेरे : श्रीराम जन्मोत्सव २०२६ आणि श्रीराम जानकी मित्रपरिवार (डोलकरवाडी) यांच्या वतीने मुचकुंदी नदीच्या खाडीत आयोजित करण्यात आलेल्या 'भव्य जलतरण महास्पर्धे'ला नुकताच मोठा प्रतिसाद मिळाला. निसर्गरम्य मुचकुंदी नदीच्या पात्रात खेळाडूंनी आपल्या जलकौशल्याचे दर्शन घडवत उपस्थितांच्या नजरा खिळवून ठेवल्या. या स्पर्धेत पंचक्रोशीतील अनेक तरुणांनी आणि बालकांनी उत्साहाने सहभाग नोंदवला होता. 'लहान गट' (१० ते १६ वर्षे) आणि 'मोठा गट' (१७ ते ४० वर्षे) अशा दोन श्रेणींमध्ये ही स्पर्धा पार पडली. विनामूल्य प्रवेश असलेल्या या स्पर्धेचे नियोजन एम्रायर मरीन अँड टेक्निकल सर्व्हिसेस, रत्नागिरी यांच्या सहकार्याने करण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​स्पर्धेत प्रमुख पाहुणे: अंकुश महादेव आडेकर गाव - कुडली ता. गुहागर जि. रत्नागिरी. वय ४२ वर्ष, राज्य राखीव पोलीस दल (एसआरपीएफ) गट ११, नवी मुंबई आणि Empire Marine & Technical Services, Ratnagiri चे मालक एकनाथ धोंडू डोर्लेकर, ​उत्साही सहभाग: खाडीच्या पाण्यात पोहण्याचे आव्हान स्वीकारत स्पर्धकांनी वेगवान कामगिरी केली. वय १० वर्षांवरील ते १६ वर्षांपर्यंत लहान गट या मध्ये प्रथम:आयुष काळे(रत्नागिरी), द्वितीय:आयुष कातळे (रत्नागिरी), तृतीय:निधी भिडे (रत्नागिरी), वय १६ ते ४५ वर्षे मोठा गट या मध्ये प्रथम क्रमांक: करण मिल्के (रत्नागिरी), द्वितीय:अथर्व नाटेकर (मुंबई), तृतीय:तनया मिल्के (रत्नागिरी) विजेत्यांना आकर्षक चषक, रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले... रत्नागिरी मधील हि सर्वात प्रथम आणि भक्कम स्पर्धा पार पडली.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg