loader
Breaking News
Breaking News
Foto

कोळथरे येथे रामजन्मोत्सव सोहळा उत्साहात; प्राचीन लाकडी मंदिराचे भाविकांना आकर्षण

दापोली (​सागर गोवळे) - कोकणातील निसर्गरम्य दापोली तालुक्यातील कोळथरे येथील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात यंदाचा रामनवमी उत्सव अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दुपारी १२ वाजता 'श्रीं'चा जन्मोत्सव सोहळा पार पडला, ज्यासाठी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. प्राचीन लाकडी कोरीव कामाचे वैशिष्ट्य कोळथरे येथील राम मंदिर हे त्याच्या अतिप्राचीन आणि देखण्या लाकडी रचनेसाठी ओळखले जाते. पूर्णपणे लाकडी साहित्यापासून बनवलेले हे मंदिर आजही आपल्या मूळ स्वरूपात टिकून आहे. मंदिरातील कोरीव काम आणि पुरातन वास्तुकला पाहण्यासाठी दरवर्षी उत्सवाच्या निमित्ताने अनेक भाविकांची पावले कोळथरेकडे वळतात. यंदाही या ऐतिहासिक वारशाचे दर्शन घेणे हे भाविकांसाठी खास आकर्षणाचे केंद्र ठरले. ​भजन, कीर्तन आणि महाप्रसादाने या उत्सवाची सांगता झाली. 'श्रीरामाच्या' जयघोषाने संपूर्ण कोळथरे परिसर दुमदुमून गेला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg