loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी तालुक्यात रामजन्मोत्सव उत्साहात, कलंबिस्त येथील श्री लिंगेश्वर मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम

​सावंतवाडी (प्रतिनिधी) : सावंतवाडी शहरासह संपूर्ण तालुक्यात गुरुवारी श्री रामनवमी उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. शहरातील हनुमान मंदिरांसह ग्रामीण भागातही रामजन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विशेषतः कलंबिस्त येथील श्री लिंगेश्वर मंदिरात सकाळपासूनच भाविकांची मांदियाळी पाहायला मिळाली. ​कलंबिस्त येथे सकाळी पूजाअर्चा झाल्यानंतर सकाळी ११ वाजता ह.भ.प. भागवत यांचे कीर्तन पार पडले. आपल्या कीर्तनातून त्यांनी रामजन्माचा प्रसंग आणि महती विशद केली. "आजच्या मोबाईलच्या युगात आपण आपली संस्कृती आणि मूल्ये विसरत चाललो आहोत का?" असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी वर्तमानातील उदाहरणे दिली. नामस्मरणाचे महत्त्व सांगतानाच त्यांनी उपस्थितांना भक्तीरसात मंत्रमुग्ध केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​दुपारी ठीक १२ वाजता पाळणा गीत गाऊन श्री रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी 'श्री राम जय राम जय जय राम'च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. जन्मोत्सवानंतर भाविकांना सुंठवडा व प्रसादाचे वाटप करण्यात आले. दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, तर सायंकाळी श्री लिंगेश्वर मंदिर परिसरात पालखी मिरवणूक काढण्यात आली. ​रात्री स्थानिक भजने आणि हनुमान दशावतार नाट्य मंडळाचा पौराणिक प्रयोग सादर करण्यात आला. सावंतवाडी शहरातील हनुमान मंदिरातही सकाळपासूनच विविध धार्मिक विधी पार पडले. संपूर्ण तालुक्यात रामनामाचा जयघोष आणि भक्तीमय वातावरण अनुभवायला मिळाले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg