loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा सरपंच सेवा संघाच्या वतीने जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांचा सत्कार

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - जिल्हा सरपंच सेवा संघ, सावंतवाडीच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे नूतन अध्यक्ष प्रमोद कामत यांचा विशेष सत्कार सोहळा इन्सुली येथील मंगल कार्यालय' येथे उत्साहात पार पडला. सरपंच सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांच्या हस्ते कामत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते आदर्श पुरस्कार प्राप्त सरपंच दीपक नाईक (किनळे) व गुणाजी गावडे (वेत्ये) यांचा शाल, श्रीफळ व शिवप्रतिमा देऊन गौरव करण्यात आला. काही अपरिहार्य कारणास्तव जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री. दादा साईल या कार्यक्रमास उपस्थित राहू शकले नाहीत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​सत्काराला उत्तर देताना अध्यक्ष प्रमोद कामत म्हणाले की, "मी स्वतः सरपंच पदापासून कामाची सुरुवात केल्यामुळे ग्रामपंचायत स्तरावरील अडचणींची मला पूर्ण जाण आहे. पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा विकास करताना सरपंचांना विश्वासात घेतले जाईल. जिल्हा परिषदेत सरपंचांच्या समस्या मांडण्यासाठी आणि त्यांना बसण्यासाठी स्वतंत्र 'सरपंच दालन' उपलब्ध करून देण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेन." ​कार्यक्रमात माजी सरपंच सुरेश गावडे यांनी सरपंच संघटनेच्या २०१८ पासूनच्या प्रवासाचा आढावा घेतला. डेटा ऑपरेटर, सीआरझेड, वीजबिल आणि वित्त आयोग यांसारख्या प्रश्नांवर संघटनेने केलेल्या संघर्षाची त्यांनी आठवण करून दिली. जिल्हाध्यक्ष प्रेमानंद देसाई यांनी सांगितले की, सरपंच म्हणून अनुभव असलेले व्यक्तीच आज अध्यक्ष-उपाध्यक्ष पदावर बसले आहेत, ही अभिमानाची गोष्ट असून यामुळे ग्रामीण भागातील प्रश्न लवकर सुटण्यास मदत होईल.

टाईम्स स्पेशल

या कार्यक्रमाला सावंतवाडी तालुकाध्यक्ष हनुमंत पेडणेकर, माजी सरपंच सचिन कदम, अनुप नाईक, संतोष आंग्रे, प्रमोद गावडे, समीर केरकर, विनेश गवस, गुरूदास गवंडे यांसह जिल्ह्यातील अनेक आजी-माजी सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण परब यांनी केले, तर आभार हनुमंत पेडणेकर यांनी मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg