दोडामार्ग (प्रतिनिधी) - गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या कोल्हापूर, कागल, राधानगरी, आगारातून येणाऱ्या कोल्हापूर, गडहिंग्लज, नेसरी, चंदगड, तिलारीनगर, दोडामार्ग, पणजी दरम्यान सुरू असलेल्या तीन ते चार बसेस बंद ठेवल्या आहेत. कोल्हापूर पणजी एकच बस सुरू ठेवली आहे. अनेक बसेस गेल्या काही महिन्यांपूर्वी पासून बंद ठेवल्या आहेत. यामुळे या बसवर अवलंबून असलेले विद्यार्थी, प्रवाशी, नोकरदारवर्ग यांची मोठी गैरसोय होत आहे. तेव्हा कोल्हापूर आगाराने तातडीने बसेस सूरु करून गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.
कोल्हापूर येथून सकाळी 6 वाजता तसेच 8.30 वाजता नंतर 12 वाजता 12.30 वाजता कोल्हापूर ते पणजी व्हाया दोडामार्ग बसेस सुरू होत्या. यामुळे चंदगड दोडामार्ग तालुक्यातील विद्यार्थी प्रवाशी, नोकरदार वर्ग, व्यापारी यांना सोयीस्कर होते. पण कोणत्याही प्रकारचे कारण न देता अचानक येथील तीन बसेस बंद केल्या. कोल्हापूर पणजी (वस्ती) बस देखील बंद केली. तेव्हा गैरसोय लक्षात घेऊन बसेस सुरू करा अशी मागणी केली जात आहे. राधानगरी पणजी बस सेवा सुरू होती, ती चंदगड येथून 2.30 वाजता पणजी येथे जात होती. यामुळे कामावर जाणारे कामगार यांची सोय झाली होती. ही बस देखील बंद केली या मार्गावर इतर बस नाही यामुळे आंबोली मार्गे जादा भुर्दंड सहन करु प्रवास करावा लागतो.
कोल्हापूर आगारातून कोल्हापूर पणजी तीन बसेस पणजी येथे जात होत्या. दोन माघारी तर एक वस्ती राहुन सकाळी सुटत होती. तर कोल्हापूर दोडामार्ग दोन बसेस सुरू आहेत. पणजी महामार्गावर फक्त एकच बस सेवा सुरू आहे. दोन बसेस बंद आहेत. यामुळे मोठया प्रमाणात गैरसोय होत आहे. पणजी येथून दुपारी सुटणाऱ्या बसेस पैकी एक चालू आहे. दोन बंद यामुळे मोठया प्रमाणात गैरसोय वाढली आहे.



















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.