सावंतवाडी (वार्ता) - राज्य महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभागाने प्रस्तावित केलेल्या “महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६” या मसुद्याला महाराष्ट्र मंदिर महासंघाने तीव्र विरोध दर्शविला आहे. महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वतीने राज्यपाल, मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांना देण्यासाठी सावंतवाडी येथील नायब प्रांतधिकारी मनोज मुसळे यांच्या जवळ निवेदन देऊन हा मसुदा तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे. या निवेदनात म्हटले आहे की, प्रस्तावित अधिनियमामुळे राज्यातील देवस्थान इनाम जमिनींचे अस्तित्व धोक्यात येणार असून मंदिरांच्या मालकीच्या जमिनी कब्जेदार, मिरासदार, पुजारी किंवा अन्य धारकांच्या नावावर जाण्याचा मार्ग मोकळा होईल. यामुळे मंदिरांचे पारंपरिक उत्पन्नाचे स्रोत संपुष्टात येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
महासंघाच्या म्हणण्यानुसार, देवस्थान इनाम जमिनी या देवतेच्या मालकीच्या असून भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद १४, २५, २६ आणि ३००-अ अंतर्गत धार्मिक संस्थांना मिळालेल्या घटनात्मक अधिकारांचे या मसुद्यामुळे उल्लंघन होत आहे. देवस्थानांची मूर्ती ही कायदेशीर व्यक्ती मानली जाते, त्यामुळे तिची मालमत्ता अशा प्रकारे हस्तांतरित करणे असंवैधानिक असल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. तसेच मसुद्यातील काही कलमांद्वारे अनधिकृत धारकांना किंवा दीर्घकाळ ताब्यात असलेल्या व्यक्तींना जमिनींचे हक्क देण्याची तरतूद असल्याने मंदिरांच्या मालमत्तेवर अतिक्रमण करणाऱ्यांना कायदेशीर संरक्षण मिळेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे.
महासंघाने शासनाकडे पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत : प्रस्तावित महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन अधिनियम २०२६ तात्काळ मागे घ्यावा. देवस्थान जमिनींचे संरक्षण करण्यासाठी स्वतंत्र कठोर कायदा लागू करावा. देवस्थान जमिनींवरील अतिक्रमण रोखण्यासाठी अँटी लँड ग्रॅबिंग कायदा लागू करावा. मसुद्यावर सूचना व हरकती नोंदविण्यासाठी किमान दोन महिन्यांची मुदतवाढ द्यावी. देवस्थान जमिनींना महसूल अभिलेखात “प्रतिबंधित सत्ता प्रकार” अशी विशेष नोंद करण्यात यावी. महाराष्ट्र मंदिर महासंघाने शासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घ्यावी, अन्यथा राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. यावेळी सर्वश्री चंद्रकांत बिले, एकनाथ सावंत, दिलीप आठलेकर, शिवराम देसाई, बाळा डांगी, सचिन गवस, मंगेश गावडे, बाबू परब, रामचंद्र गुरव, विलास गावकर, विनायक परब, उत्तम परब, रवी भिसे, पुंडलिक सावंत, शरद राऊळ, रघुनाथ सावंत, दत्ताराम सावंत, प्रमोद परब, प्रदीप देसाई, सुभाष परब, चंद्रकांत बिले, एकनाथ सावंत, दिलीप आठलेकर, आदी उपस्तिथ होते.



















































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.