loader
Breaking News
Breaking News
Foto

कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालयाला सैनिक पतसंस्था चे कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते श्याम कलंबिस्तकर यांच्याकडून पुस्तक भेट

सावंतवाडी (प्रतिनिधी) - कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालयाला सावंतवाडीतील सैनिक पतसंस्थेचे कर्मचारी तथा सामाजिक कार्यकर्ते श्याम विश्राम कलंबिस्तकर यांनी त्यांचे भाऊ महेश कलंबिस्तकर यांच्या स्मरणार्थ ३१२० रुपये किंमतीची नविन पुस्तके भेटस्वरूपात दिली. ते म्हणाले कलंबिस्त गावात ज्ञानमंदिर वाचनालयाचे उभारणी करण्यात आली आहे. हे वाचनालय निश्चितच गावाच्या विकासाला गती देणारे आहे. यावेळी जिल्हा ग्रंथालय संघाचे संचालक तथा कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालयाचे माजी सचिव ॲड. संतोष सावंत यांनी श्याम कलंबिस्तकर यांनी वाचनाला पुस्तके देणगी स्वरूपात देऊन गावातील मुलांना वाचनाची गोडी लागावी या हेतूने त्यांनी ही पुस्तके दिली आहेत. त्यांचा हेतू उत्तम आहे निश्चितच ज्ञान मंदिर वाचनालय त्यांना अभिप्रेत असलेले काम करेल. यावेळी वाचनालयाचे सचिव अनिल सावंत, माजी अध्यक्ष रूपा सावंत, उपाध्यक्ष रमेश सावंत, ग्रंथपाल दीपा जाधव आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg