सावंतवाडी (प्रतिनिधी) - कोकणातील तसेच महाराष्ट्रातील विद्रोही सांस्कृतिक चळवळीतील आजच्या आघाडीच्या लक्षवेधी युवा कवयित्री स्नेहा विठ्ठल कदम (सावंतवाडी) यांना दिल्ली येथे होणाऱ्या साहित्य अकादमीच्या साहित्य महोत्सवात महाराष्ट्रातील युवा कवींच प्रतिनिधित्व करण्याचे सन्मानपूर्वक निमंत्रण दिले आहे. दिल्ली येथील ३० मार्च ते ४ एप्रिल दरम्यान होणाऱ्या या भव्य साहित्य महोत्सवात ३ एप्रिल रोजी युवा साहित्य संमेलनात कवयित्री स्नेहा कदम यांचे मराठी, इंग्लिश, आणि हिंदी असे बहुभाषिक काव्य सादरीकरण होणार असून साहित्य अकादमीसाठी दिल्ली येथे काव्य वाचनासाठी निमंत्रित होणाऱ्या कवयित्रींमध्ये कोकणातून त्या पहिल्याच कवयित्री असल्यामुळे कोकणच्या साहित्य आणि सांस्कृतिक स्तरांमधून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.
भारत सरकारच्या साहित्य अकादमीतर्फे दरवर्षी राष्ट्रीय पातळीवरील साहित्य उत्सव आयोजित केला जातो. देशभरात वेगवेगळ्या भागात महत्त्वाचे लेखक कवी या संमेलनासाठी निमंत्रित केले जातात. अलीकडल्या काही वर्षात या साहित्य उत्सवात युवा साहित्य संमेलनात विशेष काव्य लिहीत असलेल्या भारतीय युवा लेखक कवीना निमंत्रित करून आयोजित केले जाते. यावर्षीच्या या युवा संमेलनासाठी सावंतवाडीच्या कवयित्री स्नेहा कदम यांना निमंत्रित केले गेले असून त्या मराठी भाषेचे प्रतिनिधित्व दिल्लीतील या साहित्य संमेलन करणार असल्याने कोकणच्या विद्रोही सांस्कृतिक परंपरेच्या दृष्टीने ही अभिमानास्पद घटना आहे. तळकोकणातील विद्रोही सांस्कृतिक चळवळ गेली अनेक वर्ष कार्यरत आहे. परंतु या चळवळीतून लेखन करणाऱ्या कोणत्याही लेखक कवीला दिल्लीपर्यंत जाण्याचा सन्मान प्राप्त झाला नव्हता. मात्र स्नेहा कदम यांनी आपल्या जिद्दीतून उत्तम कविता लिहित सामाजिक जाणीव सातत्याने जागृत ठेवल्याने त्याना साहित्य अकादमीच्या या वर्षीच्या युवा साहित्य संमेलनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
कवयित्री स्नेहा विठ्ठल कदम यांचा 'शिल्लक भितीच्या गर्भ कोषातून' हा काव्यसंग्रह महाराष्ट्रात प्रसिद्ध असुन या कवितासंग्रहाला पद्मश्री नारायण सुर्वे,पद्मश्री नामदेव ढसाळ, उत्तम सर्वोत्तम असे विशेष पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कविता इंग्रजी भाषेत अनुवादीत झाल्या असून मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातही त्यांच्या कवितेचा समावेश करण्यात आला आहे. त्यांचा सदर संग्रह वाचून अनेक मान्यवर समीक्षकांनी गौरव उद्गगार काढले असून तळकोकणात विद्रोही परंपरेत एवढी उत्तम कविता लिहिली गेली नाही अशी प्रतिक्रिया अभ्यासकांनी नोंदवली आहे. साहित्य अकादमीच्या दिल्लीतील संमेलनासाठी स्नेहा कदम यांची निवड झाल्याने त्यांच्या कवितेची सदर गुणवत्ता अधोरेखित झाली आहे.




























































































































.jpg)























































































.jpg)





























.jpg)
































































































































































































































































































































.jpg)

















64.jpg)






3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.