बांदा (प्रतिनिधी) - झोळंबे येथील श्री देवी माऊली मंदिरात रविवारी दिनांक २४ मे रोजी सकाळी १० वाजता भव्य पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री स्वामी समर्थ महाराज, अक्कलकोट यांनी वापरलेल्या मूळ चर्म पादुकांचे झोळंबे गावात प्रथमच आगमन होत असून, या निमित्ताने स्वामी पादुकांची सुवाद्य नामघोषात मिरवणूक काढण्यात येणार आहे.
या सोहळ्यानिमित्त मंदिरात अभिषेक व महाआरतीचे आयोजन करण्यात आले असून, पाच दांपत्यांच्या हस्ते अभिषेक संपन्न होणार आहे. अक्कलकोट येथील स्वामी समर्थांचे परमभक्त श्री चोळप्पा महाराज यांचे पाचवे वंशज वेदमूर्ती श्री नितीन महाराज पुजारी, ब्रह्मवृंद, श्री दादा गावस तसेच गुरुमाऊली (स्वामी समर्थ मठ घावनळे) यांच्या उपस्थितीत धार्मिक कार्यक्रम पार पडणार आहेत.
दुपारी २ ते ४ या वेळेत दर्शन व महाप्रसादाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे. तसेच सायंकाळी ६ वाजता स्वामी पादुका (पालखी) अक्कलकोटकडे मार्गस्थ होणार आहेत. या धार्मिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहून स्वामी पादुकांचे दर्शन व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समर्थ झोळंबे ग्रामस्थ यांच्या वतीने करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी देणगी अथवा आर्थिक मदतीसाठी बंड्या राऊळ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.























































































































































































































































































































































































































































































































































































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.