loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा नगरपंचायत प्रशासनाकडून नागरिकांच्या सोयीसाठी फिरते शौचालय, भाजपाचे संजय यादव यांच्या प्रयत्नांना यश

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - अखेर भाजपाचे माजी नगरसेवक, गटनेता संजय यादव यांच्या प्रयत्नांना यश आले असून तोडण्यात आलेल्या निर्मल शौचालयाच्या ठिकाणी आज मंगळवारपासून लांजा नगरपंचायत प्रशासनाकडून नागरिकांच्या सोयीसाठी फिरते शौचालय (मोबाईल टॉयलेट)उपलब्ध करून देण्यात आले आहे. लांजा शहरात मुंबई गोवा महामार्गाला लगत आणि शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी निर्मल शौचालय उभारण्यात आले होते. हे निर्मल शौचालय सर्वच नागरिकांना अतिशय सोयीचे ठरत होते. शहरात विविध कामानिमित्त येणारे नागरिक, मंगळवारचा भरणारा आठवडी बाजार त्याचप्रमाणे येथील रिक्षा व्यवसायिक, टेम्पो व्यवसायिक व अन्य छोटे मोठे व्यावसायिक त्याचप्रमाणे नागरिक, प्रवासी वर्ग आणि विद्यार्थी यांना देखील निर्मल शौचालय हे सोयीचे ठरत होते. मात्र मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात हे शौचालय बाधीत होत असल्याने हे निर्मल शौचालय प्रशासनाकडून तोडण्यात आले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

परिणामी कामानिमित्त शहरात येणारे ग्रामस्थ, व्यावसायिक, रिक्षा व्यवसायिक, टेम्पो व्यवसायिक, दुकानदार तसेच अन्य सर्वच नागरिकांची मोठी गैरसोय होत होती. नागरिकांची होणारी ही गैरसोय लक्षात घेऊन भाजपाचे माजी नगरसेवक,गटनेता संजय यादव यांनी याबाबत तातडीने नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांची भेट घेऊन या ठिकाणी फिरते शौचालय उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. त्याबाबत त्यांनी तशी चर्चा देखील केली होती. या चर्चेमध्ये मुख्याधिकारी कुंभार यांनी सोमवार किंवा मंगळवार पर्यंत तोडलेल्या निर्मल शौचालय या ठिकाणी फिरते शौचालय उपलब्ध करून देतो असे ठोस आश्वासन दिले होते.

टाइम्स स्पेशल

त्यानुसार आज मंगळवारी १६ डिसेंबर पासून तोडण्यात आलेला निर्मल शौचालयाच्या ठिकाणी नागरिकांसाठी फिरते शौचालय उपलब्ध करून देण्यात आले आहे. अशाप्रकारे लांजावासियांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन फिरते शौचालय उपलब्ध करण्याच्या दृष्टीने तातडीने प्रयत्न करणाऱ्या संजय यादव यांच्यावर नागरिकांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg