loader
Breaking News
Breaking News
Foto

ओंकार हत्तीची वन कर्मचारी यांना हुलकावणी, कळपात सामिल न होता पुन्हा भिकेकोनाळ दाट जंगलात आश्रयाला

दोडामार्ग (प्रतिनिधी) - सावंतवाडी, बांदा, गोवा येथून माघारी फिरून तीन दिवसांपूर्वी दोडामार्ग तालुक्यातील कळणे गावात दाखल होऊन या ठिकाणी एका बैलावर हल्ला चढवून ठार करून हा ओंकार हत्ती चालत चालत रस्त्याने भिकेकोनाळ, कुंब्रल, केर, मोर्ले, घोटगेवाडी पर्यंत गेला होता. येथून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या हेवाळे घाटीवडे हत्ती कळपात सामिल होईल अशी आशा होती .पण याला तिलांजली देत ओंकार हत्ती याच्या मनात काय आले कोण जाणे ओंकार हत्ती पुन्हा माघारी फिरून भिकेकोनाळ दाट जंगलात दाखल होऊन आश्रय घेतला आहे. यामुळे काजू बागेत साफसफाई करण्यासाठी जाणाऱ्या ग्रामस्थ यांच्यात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन दिवसांपूर्वी तोरसे पेडणे गोवा येथून माघारी फिरून फोंडये, कळणे, असा परतीचा प्रवास ओंकार हत्ती याने सुरू केला होता. मानवाच्या चाली प्रमाणे चालत तो पुढे सरकत होता. यावेळी शेतात बांधलेल्या बैलावर हल्ला चढवला होता. जायबंदी झालेला बैल मरण पावला होता. वन कर्मचारी हाकारे तसेच ओंकार प्रेमी यांनी ओंकार हत्ती याला कळपात पाठवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत तीन दिवसात त्याला घोटगेवाडी पर्यंत नेले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या परिसर ओंकार हत्ती याला परिचित आहे. त्यामुळे दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगली हत्ती कळपात सामिल होईल अशी आशा होती पण ती निष्फळ ठरली. ओंकार हत्ती वन कर्मचारी हाकारे याना हुलकावणी देऊन भिकेकोनाळ गावात रविवारी रात्री उशिरा दाखल झाला यामुळे भिकेकोनाळ गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवारी ओंकार हत्ती भिकेकोनाळ गावात घनदाट जंगलात आश्रय घेतलेल्याचे दिसून आले. वन कर्मचारी हाकारे रस्त्यावर थांबून ओंकार रस्त्यावर येतो काय याची प्रतिक्षा करत होते. या ठिकाणी मोठे जंगल आहे. यामुळे हत्ती स्थिरावला आहे. सद्या काजू हंगाम सुरू झाला आहे. अनेक शेतकरी काजू बागेत गवत झाडी साफसफाई करण्यासाठी जातात पण ओंकार हत्ती दाखल झाला आहे. यामुळे गावात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी काजू बागेत जाणे टाळले आहे.

टाइम्स स्पेशल

ओंकार हत्ती घोटगेवाडी पर्यंत गेला पुढे दहा किलोमीटर अंतरावर हत्ती कळप आहे. यात गणेश हत्ती आहे. याच्या भितीने ओंकार माघारी फिरला कि ओंकार याच्या मनात नेमके काय सूरू आहे. सव्वा दोन महिन्यानी माघारी फिरलेला ओंकार हत्ती पुन्हा भिकेकोनाळ गावात दाखल झाला आहे. यामुळे हा हत्ती पुन्हा गोवा राज्यात तर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भिकेकोनाळ गावात वन कर्मचारी हाकारे ओंकार हत्ती वर लक्ष ठेवून आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg