loader
Breaking News
Breaking News
Foto

शेलारवाडी धरणग्रस्तांना मिळणार वैयक्तिक शौचालय अनुदान

गुणदे(वार्ताहर) - खेड तालुक्यातील शेलारवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन गुणदे गणवाल व लवेल तळाचा आडवा येथे करण्यात आले आहे. या प्रकल्पग्रस्तांना वाटप करण्यात आलेल्या भूखंडामध्ये वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले आहे. याबाबत १९९९ च्या पुनर्वसन कायद्याप्रमाणे वैयक्तिक शौचालय अनुदानाची रक्कम नुकतीच अदा करण्यात आली आहे. १९९९ च्या कायद्यातील तरतुदी प्रमाणे कलम ३ (आय)नुसार वैयक्तिक शौचालय अनुदान देणे हे कायद्यात आहे. तत्कालीन गणवाल विकास समितीच्या माध्यमातून याबाबत पाठपुरावा करण्यात आला होता. याबाबत मा. जिल्हाधिकारी कार्यालयातून तहसीलदार खेड यांना आलेल्या पत्रानुसार तलाठी सजा गुणदे, ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत गुणदे व प्रकल्पाचे शाखा अभियंता यांच्याकडून संबंधित प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थितीत शौचालय बांधकाम पाहणी करण्यात आली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पाहणी अहवाल तहसीलदार कार्यालय व पाटबंधारे कार्यालयाकडून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर झाल्यावर त्यास अंतिम मंजुरी मिळून निधी मागणी करता मा.कार्यकारी संचालक कोकण पाटबंधारे विकास महामंडळ या कार्यालयाकडे सादर करण्यात आला होता. या कार्यालयाकडून निधी प्राप्त होताच मा. कार्यकारी अभियंता व प्रकल्प अधिकारी यांच्याकडून गावठाणा मध्ये नुकतीच हस्त पावती बनवण्याबाबत कॅम्प आयोजित करण्यात आला होता. अनेक प्रकल्पग्रस्तांच्या उपस्थितीत योग्य ती कागदपत्रे जमा करून हस्त पावती बनवण्यात आली. आता शौचालय अनुदान रक्कम थेट प्रकल्पग्रस्तांच्या बँक खात्यातच जमा होणार आहे.

टाइम्स स्पेशल

यापूर्वी जिल्ह्यात गड नदी प्रकल्पातील नांदगाव पुनर्वसन गावठाणातील प्रकल्पग्रस्तांनी प्रथम याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून अशा प्रकारचे शौचालय अनुदान मंजूर करून घेतले होते. यानंतर आता शेलारवाडी प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांनी ही वैयक्तिक शौचालय अनुदान मंजूर करून घेतले आहे. जिल्ह्यातील इतर प्रकल्पग्रस्तांनाही असे वैयक्तिक शौचालय अनुदान मिळण्याबाबत पाटबंधारे व पुनर्वसन कार्यालयाकडून कार्यवाही करणे गरजेचे असून प्रकल्पग्रस्तांनी याबाबत पाठपुरावा करावा, असे माजी कोकण विभागीय पुनर्वसन समिती सदस्य संतोष आंब्रे यांनी आवाहन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg