loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाणे शहरात 19 डिसेंबर पर्यत 50 टक्के पाणी कपात

ठाणे (प्रतिनिधी) : कल्याण फाटा येथील महानगर गॅसच्या कामांमध्ये ठाणे शहराला पाणीपुरवठा करणारी पिसे बंधारा येथून टेमघर जलशुध्दीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी 1000 मि.मी व्यासाची जलवाहिनी चार ते पाच वेगवेगळ्या ठिकाणी 11 डिसेंबर 2025 रोजी नादुरूस्त झाली होती, सदर जलवाहिनी दुरूस्त करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, परंतु या कामास आणखी 4 दिवसाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे, त्यामुळे ठाणे शहरात 19 डिसेंबर 2025 पर्यत 50 टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पाणीपुरवठा विभागामार्फत जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने व जलदगतीने करण्यात येत आहे. मात्र जलवाहिनी जुनी व प्रिस्ट्रेस काँक्रीट पद्धतीची असल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी विलंब होत असून हे काम पूर्ण होण्यास अजून 4 दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. परिणामी, ठाणे शहराकडे येणारा पाणीपुरवठा कमी झाला असून शहरांमध्ये 50 टक्के पाणी कपात लागू करण्यात येत आहे.

टाइम्स स्पेशल

शहरामध्ये पाणी वितरणाचा समतोल ठेवण्यासाठी 19. डिसेंबर.2015 पर्यंत प्रत्येक भागास दिवसातून 12 तास झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांना कमी प्रमाणात व अनियमित पाणीपुरवठा होईल. नागरिकांनी पाण्याचा वापर जपून करावा व महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहन पाणीपुरवठा विभागामार्फत करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg