loader
Breaking News
Breaking News
Foto

डॉ. महेश अभ्यंकर यांचे गुहागर येथे मार्गदर्शन शिबीर संपन्न

वरवेली (गणेश किर्वे) - लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी व ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ, खेड (रत्नागिरी) आयोजित गुहागर येथील विद्यार्थ्यांसाठी नि:शुल्क JEE, NEET, CET व स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन शिबिर भवानी सभागृह, शृंगारतळी येथे आयोजित करण्यात आले होते. सदर मार्गदर्शन शिबिरास प्रमुख मार्गदर्शक वैद्यकीय सल्लागार, औषध आणि रणनीतीतज्ञ, लेखक, संशोधक व NEET/JEE यांसारख्या स्पर्धा परीक्षांचे समुपदेशक डॉ. महेश अभ्यंकर, लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटी चे अध्यक्ष ला. सचिन मुसळे, सेक्रेटरी ला. शैलेंद्र खातू, खजिनदार ला. नितीन बेंडल, झोन चेअरमन ला. शामकांत खातू, माजी अध्यक्ष व सल्लागार ला. संतोष वरंडे , ज्ञानदीप संस्थेचे विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढ्ढा, विश्वस्त भालचंद्र कांबळे, प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार मगदूम, पर्यवेक्षक संतोष भोसले, विभाग प्रमुख विठ्ठल सकुंडे, मारुती आडाव, इ. मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पर्यवेक्षक संतोष भोसले यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय मकरंद दाबके यांनी केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

गुहागर सारख्या ग्रामीण भागातील इ. ११ वी व १२ वी विज्ञान शाखेतील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना JEE, NEET, CET व स्पर्धा परीक्षांचे नि:शुल्क मार्गदर्शन मिळावे व कोकणातील विद्यार्थी मनात कोणतीही भीती न बाळगता आत्मविश्वासाने JEE, NEET, CET सारख्या काठीण्य पातळी असणाऱ्या परीक्षांना सामोरे जावेत यासाठी सदर नि:शुल्क मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात JEE / NEET / MHT-CET परीक्षांच्या तयारीसंदर्भात तसेच Engineering, Medical आणि Pharmacy क्षेत्रातील करिअरच्या विविध संधींबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. या मार्गदर्शन शिबिरातून इच्छुक विद्यार्थी आणि पालकांना भविष्यातील शिक्षण आणि करिअरविषयी योग्य दिशा मिळणार असल्याची त्यांना खात्री वाटते. विद्यार्थ्यांनी “मोठी स्वप्न पाहावी, लवकर सुरवात करावी, सातत्य राखावे, एम. सी. कयू.ची उत्तम तयारी करावी, मेहेनतीला प्रयोजनाची जोड द्यावी, आई-वडिलांची आणि शिक्षकांची सोबतीने मन सुद्रुढ ठेऊन आत्मविश्वासाने या मार्गदर्शनातून उत्कृष्ट यश संपादन करावे असे त्यांचे स्वप्न आहे, यासाठी आतापासूनच नियोजनबद्ध व परिपूर्ण तयारी कशी करावी, स्वतः कसे प्रयत्न करावेत? याचे संपूर्ण मार्गदर्शन यावेळी मा. डॉ. महेश अभ्यंकर यांनी केले.

टाइम्स स्पेशल

कार्यक्रमाचे आभार प्रशालेचे मुख्याध्यापक राजकुमार मगदूम यांनी मानले. सदर विनामूल्य शिबिर अतिशय नियोजनबद्ध पार पाडण्यासाठी लायन्स क्लब ऑफ गुहागर सिटीचे माजी अध्यक्ष व सल्लागार ला. संतोष वरंडे व त्यांचे सर्व सहकारी यांचे अतिशय मोलाचे सहकार्य लाभले. या उपक्रमाचे संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, खजिनदार विनोद बेंडखळे, विश्वस्त व जनसंपर्क अधिकारी दीपक लढढा, विश्वस्त पेराज जोयसर, भालचंद्र कांबळे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, संस्थापक सदस्य चंदन पाटणे, प्रफुल्ल महाजन, अनिल शिवदे, रुपल पाटणे व सल्लागार मंडळ सदस्य, ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg