loader
Breaking News
Breaking News
Foto

एलईडी मासेमारी करणार्‍या २ नौका गस्ती पथकाने पकडल्या

रत्नागिरी (वार्ताहर): - सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकाने एलईडी मासेमारीसाठी वापरली जाणारी नौका रविवारी रात्री पकडली. महिन असे या नौकेचे नाव आहे. पूर्णगड समुद्रात ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती सहाय्यक मत्स्य व्यवसाय विभागाच्या गस्ती पथकातील अधिकार्‍यांनी पत्रकारांना दिली. दरम्यान १० दिवसांपूर्वीही एलईडी प्रकाश व्यवस्थेची साहित्य असलेली हर्षाली नावाची नौका पकडण्यात आली होती. एलईडी प्रकाशातील मासेमारी बेकायदेशीर असून महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमनच्या सुधारीत नियमानुसार नौका मालकावर ५ लाख रुपयांपर्यंत दंडात्मक कारवाई करण्याची तरतूद आहे. पकडलेल्या दोन्ही एलईडी नौका मिरकरवाडा बंदरात अडकवून ठेवण्यात आल्या आहेत. सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्तांसमोर या प्रकरणी सुनावणी होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी लतिका गावडे आणि सहाय्यक मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी रसिका सावंत पथकासोबत गस्ती नौकेतून गस्त घालत होत्या. रविवारी रात्री ११ वा.च्या सुमारास पूर्णगड समुद्रात महिन नौकेवर एलईडी लाईट पेटलेले दिसून आले. त्यामुळे ती नौका ताब्यात घेवून मिरकरवाडा बंदरात अडकवून ठेवण्यात आली आहे. १० दिवसांपूर्वी अंमलबजावणी अधिकारी तथा परवाना अधिकारी चिन्मय जोशी समुद्रात गस्ती नौकेतून गस्त घालत होते. मध्यरात्रीच्या वेळी रत्नागिरी समुद्रात एलईडी लाईट असलेली हर्षाली नौका दिसून आली. या दोन्ही नौका ताब्यात घेवून एलईडी दिव्यांसह जनरेटर व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg