loader
Breaking News
Breaking News
Foto

थंडीच्या दिवसात बालकांचे आरोग्य, सर्दीपासून संरक्षण

पुणे - नुकतेच जन्मलेले बालक किंवा दोन वर्षांखालील बालकांचे आरोग्य जपणे फार महत्वाचे आहे. नवीन वातावरणाशी सांगड घालताना त्यांच्या जाणीवा अधिक असतात, त्यामुळे नवजात बालकांचे आरोग्य जपणे महत्वाचे असते. मुलांची प्रतिकार शक्ती कमकुवत असल्याने निष्काळजीपणा दाखविला तर त्यांच्या आरोग्याला हानी पोहोचू शकते. सर्दीच्या हंगामात छोट्या बालकांना उबदार कपडे घालणे आवश्यक आहे. बालक कितीही अंगावर कपडे घालण्यास नकार देत असेल तरीही उबदार कपडे घालणे आवश्यक आहे. या हंगामात लहान मुलांचे सर्दी तापापासून संरक्षण करणे गरजेचे ठरते. डॉ. सिद्धार्थ मदभुशी हे अंकुरा हॉस्पिटल पुणेचे निओनॅटोलॉजिस्ट आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यांचे म्हणणे आहे की, हिवाळ्याच्या दिवसात घसरणारे तापमान आणि जीवाणूंची वाढ ही लहान मुलांच्या आरोग्यासाठी घातक असते. त्यांना जपणे खूप महत्वाचे आहे. मुलांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी या दिवसात कायम पूर्ण कपडे घाला. हातापायात लोकरीचे मोजे घाला. त्यांचे कानही झाकून ठेवा. मुलांच्या कानाला आणि शरीराला हवा लागणार नाही, याची काळजी घ्या. पातळ ब्लँकेटची निवड करा. बाळाच्या अंगाला स्पर्श करून शरीर थंड वाटल्यास आखणी एक घालून त्यला उब द्या. सामान्य सर्दीपासून अर्भकाचे संरक्षण करणे गरजेचे आहे. लहान मुलांमध्ये न्यूमोनिया सारखे गुंतागुंतीचे आजार यादिवसात होऊ शकतात, त्यामुळे बाळाची काळजी घेणे गरजेचे आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg