loader
Breaking News
Breaking News
Foto

मलपीतील हायस्पीड ट्रॉलर्सकडून पारंपारिक मच्छिमारांच्या जाळ्यांचे नुकसान

मालवण (प्रतिनिधी) - मालवणसह जिल्ह्याच्या समुद्रात केरळ मलपी येथील हायस्पीड ट्रॉलर्सचा धुमाकूळ सुरु असून काल रात्री मालवण समोरील जुवा क्षेत्रातील १७ वाव समुद्रात झुंडीने आलेल्या हायस्पीड ट्रॉलर्सनी धुरीवाडा येथील पारंपारिक मच्छिमार हेमंत जोशी यांच्या नौकेवर चाल करीत त्यांची समुद्रात टाकलेली प्रत्येकी २५ किलो वजनाची न्हय मासेमारीची २० जाळी तोडून चोरून नेल्याची घटना घडली. यामुळे जोशी यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून याबाबत श्रमिक मच्छिमार संघाने मालवण येथील मत्स्य विभाग कार्यालयात धडक देत मच्छिमारांनी सदर दोन हायस्पीड ट्रॉलर्सचे टिपलेले नोंदणी क्रमांक सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांना सादर करत जाळी चोरून नेणाऱ्या केरळ येथील त्या दोन ट्रॉलर्सवर गुन्हा दाखल होऊन कायदेशीर कारवाई करावी तसेच नुकसान ग्रस्त मच्छिमारांना भरपाई मिळावी, अशी मागणी केली. तसेच यापुढे केरळचे हायस्पीड ट्रॉलर्स पकडल्यावर ट्रॉलर मालकांना मालवणात पाय ठेवू देणार नाही, असा इशारा यावेळी मच्छिमार नेते बाबी जोगी यांनी दिला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मालवण धुरीवाडा येथील पारंपारिक मच्छिमार हेमंत जोशी हे काल रात्री आपली हर्षवर्धन ही मच्छिमारी नौका घेऊन पांडुरंग माणगावकर, देवेंद्र धुरी व आत्मराम धुरी यांच्या समवेत न्हय च्या मासेमारीसाठी समुद्रात गेले होते. मालवण समोरील १६ ते १७ वाव समुद्रात जुवा या क्षेत्रात न्हय मासेमारी करत असताना त्यांनी समुद्रात जाळी टाकून ठेवली होती. यावेळी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास केरळ मलपी येथील अनेक परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स झुंडीने आले असता काही ट्रॉलर्स जोशी यांच्या ट्रॉलर्सवर चाल करून आले. यामुळे समुद्रात टाकलेली जाळी फाटून ती हायस्पीड ट्रॉलर्सनी ओढत नेली. सदर जाळीचे प्रत्येकी २५ किलो वजनाचे २० नग होते. यामुळे जोशी यांचे सुमारे ५ ते ७ लाख रुपयांचे नुकसान झाले. या घटनेवेळी मच्छिमारांनी बॅटरीच्या प्रकाशात सदर दोन हायस्पीड ट्रॉलर्सचे नंबर लिहून घेतले होते. या घटनेनंतर श्रमिक मच्छिमार संघांचे उपाध्यक्ष आणि मच्छिमार नेते बाबी जोगी यांच्या नेतृत्वाखाली आज पारंपारिक मच्छिमारांनी मालवण येथील मत्स्य विभाग कार्यालयावर धडक देत परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्स कडून स्थानिक मश्चिमारांच्या जाळ्यांच्या होणाऱ्या नुकसानी बाबत लक्ष वेधले. यावेळी जोगी यांच्या समवेत जगदीश खराडे, सुजित मोंडकर यांच्यासह नुकसानग्रस्त मच्छिमार व इतर मच्छिमार उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

यावेळी बाबी जोगी यांनी मच्छिमारांनी लिहून घेतलेले हायस्पीड ट्रॉलर्सचे नंबर सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांना सादर करत या नंबर द्वारे ट्रॉलर्सची माहिती काढून ट्रॉलर मालकावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी, तसेच झालेल्या नुकसानीचा पंचनामा करावा अशी मागणी केली. यावेळी मत्स्य विभाग कार्यलयातील अधिकाऱ्यांनी सदर नंबर द्वारे मत्स्य विभागाच्या साईटवर शोध घेतला असता दोन नंबर पैकी एका नंबरवर नोंदणी असलेल्या केरळ मलपी येथील अजय डिसोजा यांच्या मालकीच्या श्री दुर्गा परमेश्वरी (IND-KA-02-MM- 5240) या ट्रॉलरची माहिती मिळाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

कारवाईसाठी मच्छिमार आक्रमक

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg