loader
Breaking News
Breaking News
Foto

अखिल म. प्रा. शि. संघ शाखा चिपळूण च्या वतीने दिनदर्शिका-२०२६ प्रकाशन सोहळा

संगमेश्वर (मकरंद सुर्वे) - सावर्डे-अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ शाखा चिपळूण च्या वतीने सन २०२६ या नूतन वर्षाच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळा अखिल म. शिक्षक संघ जिल्हा अध्यक्ष .दिलीप देवळेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सावर्डे येथे संपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख मान्यवर दादासाहेब इरनक -गटशिक्षणाधिकारी पं. स. चिपळूण,.प्रवीण काटकर अखिल राज्य संयुक्त चिटणीस, श्रीकांत पराडकर -क्रीडा संचालक डेरवण क्रीडा संकुल, रमाकांत शिवगण-अखिल जिल्हा नेते, बळीराम मोरे -जिल्हा नेते, सतीश सावर्डेकर -अध्यक्ष अखिल शाखा चिपळूण, भालचंद्र घुले जिल्हा सरचिटणीस, संभाजी पाटील, प्रवीण सावंत, विजयफंड महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सचिव दीपक मोने, तालुकाध्यक्ष प्रकाश गांधी, सामाजिक कार्यकर्ते एजाज इब्जी, चेतना होमकर, देवराज गरगटे, संजयराव कदम, शिंदे यांच्या उपस्थितीत स्व. गोविंदराव निकम माध्यमिक हायस्कूल सावर्डे येथे मोठ्या उत्साहात संपन्न झला. या प्रसंगी बहुसंख्येने शिक्षकवृंद बंधू भगिनी व हितचिंतक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. उपस्थित सर्व मान्यवरांचा संघटनेच्या पदाधिकारी यांच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. अखिल शिक्षक संघ शाखा चिपळूण च्या वतीने आयोजित दिनदर्शिका प्रकाशन सोहळा या उपक्रमाचे कौतुक करताना जिल्हानेते रमाकांत शिगवण यांनी शाखा चिपळूण च्या कार्याबद्दल गौरवोदगार काढले. इरनक आपल्या मनोगतात म्हणाले अखिल चिपळूणची शाखा ही प्रशासनाला सातत्याने सहकार्य करीत असते. विद्यार्थी, शिक्षक व शाळा यांचा समन्वय व उपक्रमासाठी अग्रेसर असते. या स्तुत्य उपक्रमास शुभेच्छा दिल्या. दिलीप देवळेकर आपल्या अध्यक्षीय भाषणात अखिल महाराष्ट्र शिक्षक संघटना ही देशपातळीवर सक्रिय काम करणारी ही संघटना असून शाळा, शिक्षक व विद्यार्थी यांच्या समस्या राज्य व देशपातळीवर सातत्याने सोडवणारी संघटना असल्याचे सांगून,चिपळूण शाखेने अल्प कालावधीत भरारी घेऊन संघटना बांधणी बाबत केलेले नियोजन व दिनदर्शिका प्रकाशन सोहळयासारखा स्तुत्य उपक्रम, यापाठीमागे शाखेचे खंभीर नेतृत्व सतीश सावर्डेकर व टीमला श्रेय असल्याचे सांगितले.

टाइम्स स्पेशल

बळीराम मोरे आपल्या मनोगतात बोलताना म्हणाले येणारा काळ शिक्षण क्षेत्रासाठी संघर्षमय असून एकत्रितपणे काम करण्याची गरज व्यक्त केली. व अखिल शाखा चिपळूण च्या कार्याचे व उपक्रमाचे कौतुक केले. सदर दिनदर्शिका कार्यक्रमानिमित्त विजय फंड, .प्रवीण सावंत, संतोषकुमार भुवड यांनी आपल्या मनोगतात संघटनेच्या कामकाजाचा आढावा घेऊन संघटनेच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. दिनदर्शिका प्रकाशन साठी अखिल शिक्षक संघाच्या सर्व पदाधिकारी आणि सदस्य आदींनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश सावर्डेकर यांनी केले. तर सूत्रसंचालन कोषाध्यक्ष रामचंद्र नांदिवडेकर यांनी केले. उपस्थितांचे आभार सचिव संजय घाग यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मनोजकुमार घाग, संजय घाग, प्रकाश ठोंबरे, दशरथ बांबाडे, चंद्रशेखर राऊत, अजित भंडारी, अजय उपरे, अरविंद भंडारी, रविंद्र शिवडे, प्रकाश भुवड, महेंद्र तेटांबे, बाबाजी मते, विजय सावंत, संतोष जाधव, रवींद्र गोरे, योगेश गोराडे, दिनेश रोडे, पद्मजा राऊत, संचिता सावर्डेकर, वर्षा जगताप यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg