loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील बुद्धिबळ स्पर्धेत मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांचे उल्लेखनीय यश!

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी येथील मुक्ताई ॲकेडमीच्या विद्यार्थ्यांनी जिल्हास्तरीय तसेच राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध बुद्धिबळ स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी करत अनेक पारितोषिके पटकावली. मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष आणि बुद्धिबळ प्रशिक्षक कौस्तुभ पेडणेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेली दहा वर्षे ॲकेडमीच्या शेकडो विद्यार्थ्यांनी सातत्याने शालेय आणि असोसिएशनच्या जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये आपला ठसा उमटवला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

बेळगाव येथील सतीश अण्णा राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुदधिबळ स्पर्धेत 1800 रेटिंगच्या गटात बाळकृष्ण पेडणेकर पाचवा अनरेटेड गटात हर्ष राऊळ पाचवा, व्हिज्युअली चॅलेंज गटात मयुुरेेश परुळेकर पाचवा, 14 वर्षाखालील मुलींच्या गटात भुमि कामत अकरावी व साक्षी रामदुरकर पंधरावी 12 वर्षाखालील मुलांच्या गटात यश सावंत दहावा व अथर्व वेंगुर्लेकर बारावा, 10 वर्षाखालील मुलांच्या गटात पुर्वांक कोचरेकर दहावा, मेंगलोर येथील आरसीसी आंतरराष्ट्रीय ब्लिट्ज रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेत, 1800 रेटिंगच्या गटात बाळकृष्ण पेडणेकर तिसरा, शिमोगा, कर्नाटक येथील राष्ट्रीय रॅपिड रेटिंग बुदधिबळ स्पर्धेत 16 वर्षाखालील गटात तनिष तेंडोलकर तिसरा, 12 वर्षाखालील गटात हर्ष राऊळ चौथा, 8 वर्षाखालील गटात विघ्नेश अंबापूरकर तिसरा

टाइम्स स्पेशल

10 वर्षाखालील मुलांच्या गटात पुर्वांक कोचरेकर पहिला संदीप चौकेकर यांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ सावंतवाडी येथे आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मोठ्या गटात बाळकृष्ण पेडणेकर दुसरा व मयुरेश परुळेकर आठवा, 16 वर्षाखालील गटात अथर्व वेंगुर्लेकर पाचवा व चिदानंद रेडकर सातवा, मुलींच्या गटात गार्गी सावंत पहिली व भुमि कामत दुसरी, सावंतवाडीतील उत्कृष्ट खेळाडूच्या गटात विराज दळवी पहिला, हर्ष राऊळ दुसरा, पार्थ गावकर तिसरा, पुर्वांक कोचरेकर याला विशेष पारितोषिक, खारेपाटण येथील जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत मुख्य गटात पुष्कर केळूसकर दहावा, 17 वर्षाखालील गटात तनिष तेंडोलकर पहिला 14 वर्षाखालील गटात अथर्व वेंगुर्लेकर दुसरा व योगी लेले चौथा, 11 वर्षाखालील गटात लिएण्डर पिंटो पहिला, 9 वर्षाखालील गटात विघ्नेश अंबापूरकर पहिला व पुर्वांक कोचरेकर चौथा, हर्ष राऊळ, स्वरुप राऊळ यांना विशेष पारितोषिक. पारितोषिकप्राप्त विदयार्थ्यांचे सर्व स्तरातून कौतुक करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg