loader
Breaking News
Breaking News
Foto

तेली समाज प्रीमियर लीग: दापोलीत चषक व जर्सी लोकार्पण व खेळाडू लिलाव पार

वरवेली (गणेश किर्वे) - दापोली तालुका तेली समाज, श्री शनिकृपा हितवर्धक तेली समाज (दापोली, खेड, मंडणगड) यांच्या वतीने आयोजित तेली समाज प्रीमियर लीग – २०२६ चषकाचे व जर्सीचे अनावरण व खेळाडू लिलाव रविवार, ७ डिसेंबर २०२५ रोजी श्री शनिकृपा हितवर्धक तेली समाज सभागृह, तेलीवाडी, गिम्हवणे, ता. दापोली येथे यशस्वीरित्या संपन्न झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तिसऱ्या पर्वाच्या या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचे १० संघांनी सहभाग घेतला आहे. सहभागी संघांमध्ये श्री स्वामी समर्थ इलेव्हन, दादा इलेव्हन, काळकाई देवी इलेव्हन, चिंतामणी बॉईज इलेव्हन, श्री संताजी वॉरिअर्स, श्री शनिकृपा दापोली फायटर, महाकाल वॉरिअर्स चिपळूण, चिपळूण इलेव्हन, वैष्णवी इलेव्हन आणि साईच्छा इलेव्हन या संघांचा समावेश आहे. लिलावावेळी काही प्रतिभावान खेळाडूंवर झालेल्या उच्च बोलींनी सभागृहात उत्साहाची लाट उसळली. संघमालकांनी अचूक गणित मांडत स्पर्धात्मक आणि दमदार संघरचना उभी करण्यासाठी जोरदार रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

टाइम्स स्पेशल

आगामी ३ व ४ जानेवारी २०२६ रोजी रंगणाऱ्या या स्पर्धेसाठी सर्व संघांनी तयारीला वेग दिला असून, दापोलीसह संपूर्ण जिल्ह्यातील तेली समाजातील क्रिकेटप्रेमींत उत्सुकतेचा शिखर बिंदू गाठला आहे. दापोली कृषी विद्यापीठाच्या मैदानावर रंगणार्‍या या सामन्यांसाठी प्रेक्षकांची उपस्थितीही मोठ्या प्रमाणात वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. केवळ क्रीडा स्पर्धा न राहता, ही लीग समाजातील एकोप्याची सशक्त जत्रा, तरुणाईच्या जोशाची उधळण आणि क्रीडा-कौशल्याचा भव्य मेळावा ठरणार आहे!

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg