loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेल महापालिकेचा विकास अविरत सुरू राहील - प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण

पनवेल :- पनवेलचे झपाट्याने नागरीकरण होत असून हे क्षेत्र एज्युकेशन हब म्हणून पुढे येत आहे. पनवेल महापालिकेचा सर्वांगीण विकास व्हावा, या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल महापालिका दत्तक घेतली आहे. त्यामुळे यापुढेही नागरिकांचे प्रश्न मार्गी लावतानाच विकासाची गंगा अविरतपणे सुरू राहील, अशी ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार रविंद्र चव्हाण यांनी आज येथे दिली. कार्यसम्राट व लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर यांच्या विशेष प्रयत्नाने पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये सुमारे ३२५ कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पनवेल येथील लोकनेते दि.बा. पाटील विद्यालयात मार्गदर्शानात्मक कार्यक्रम माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. त्यावेळी प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण बोलत होते. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, दिबांचे चिरंजीव अतुल पाटील, माजी महापौर कविता चौतमोल, आयुक्त मंगेश चितळे, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, ऍड. प्रकाश बिनेदार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रामदास शेवाळे, आरपीआयचे प्रभाकर कांबळे यांच्यासह माजी नगरसेवक, माजी नगरसेविका उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी आपल्या भाषणातून मार्गदर्शन करताना सांगितले कि, पूर्वी नगरपरिषद असलेल्या पनवेलचा महापालिकेत रूपांतर झाल्यानंतर या भागाचा विकास व्हावा, ही लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांची नेहमीच तळमळ राहिली आहे. पनवेल महापालिकेच्या निर्मितीपासून ते तिच्या वाढीपर्यंत मी साक्षीदार आहे. महापालिकेच्या स्थापनेपासूनच पनवेलच्या विकासकामांसाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचा सातत्यपूर्ण आग्रह राहिला असल्याचे आमदार रविंद्र चव्हाण यांनी अधोरेखित केले. द्रष्टे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून महापालिकेला बळ देण्याचे काम सुरू असून नागरिकांच्या गरजा लक्षात घेऊन विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. आज या कामांचे लोकार्पण व भूमिपूजन होत असताना पनवेलमध्ये आश्वासक कार्य झाल्याचे स्पष्ट दिसत आहे, असे त्यांनी नमूद केले.

टाइम्स स्पेशल

महापालिकेला विकासाचे रूप मिळाले आणि ते रूप प्रत्यक्षपणे साकार होत आहे. आणि पुढील काळातही हा ओघ सुरूच राहणार आहे. महानगरपालिकेला विकासाचे ठोस स्वरूप मिळाले असून तो विकास प्रत्यक्षात साकार होत आहे. पुढील काळातही हा विकासाचा प्रवाह सुरूच राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पनवेलचे नाव जागतिक नकाशावर झळकले आहे. जनतेने वेळोवेळी दिलेल्या आशीर्वादांमुळेच हे शक्य झाले असून पुढेही हेच पाठबळ मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पनवेल महानगरपालिकेने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल आयुक्त मंगेश चितळे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले. आमदार विक्रांत पाटील यांचेही यावेळी भाषण झाले, प्रास्ताविक आयुक्त मंगेश चितळे यांनी केले, त्यांनी विकासकामांच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

३२५ कोटीच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg