loader
Breaking News
Breaking News
Foto

माजगाव लघु पाटबंधारे प्रकल्पाला ‘वन’ विभागाचा अडसर; ठेकेदाराची बिले थकीत, काम धीम्या गतीने

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - ​सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माजगाव येथील सुमारे २३ कोटी रुपये खर्चाचा मृदू जलसंधारण विभागाचा लघु पाटबंधारे प्रकल्प सध्या अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. ठेकेदाराचे बिल अदा केले नसल्याने आणि प्रकल्पासाठी आवश्यक असलेली वन विभागाची जमीन हस्तांतरित करण्यास विलंब होत असल्याने या प्रकल्पाच्या कामाला खिळ बसली आहे. वन विभागाने अडीच हेक्टर क्षेत्रातील झाडांचे मुल्यांकन आणि लिलाव प्रक्रिया राबविण्यात विलंब केल्याने प्रकल्पाचा पुढील टप्पा रखडला आहे. ​माजगाव येथे हा लघु पाटबंधारे प्रकल्प एका वर्षापूर्वी सुरू करण्यात आला आहे. प्रकल्पासाठी एकूण १२ हेक्टर जमीन संपादन करण्यात आली असून, त्यात अडीज हेक्टर वन जमीन समाविष्ट आहे. जमीन संपादन आणि वन विभागाच्या कामांवर आतापर्यंत ११ कोटी रुपये खर्च झाले आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रकल्प २०२७ पर्यंत पूर्ण करून पाणीसाठा करण्याचे नियोजन आहे. मात्र, वन विभागाने जमिनीतील झाडांचे मुल्यांकन आणि लिलाव प्रक्रिया तातडीने न राबविल्याने आणि शासनाकडून ठेकेदाराची बिले थकीत झाल्याने प्रकल्पाचे काम संथ झाले आहे. सुदैवाने वन विभागाने या प्रकल्पाला तत्त्वतः मान्यता दिली आहे. परंतु, वन जमिनीवर प्रत्यक्ष काम सुरू करण्यासाठी विभागाने झाडांचे मुल्यांकन आणि लिलाव प्रक्रिया पूर्ण करून मृदू जलसंधारण विभागाला नाहरकत प्रमाणपत्र देणे आवश्यक आहे. या प्रमाणपत्राशिवाय अडीच हेक्टर वन जमिनीवर काम सुरू करता येणार नाही.

टाइम्स स्पेशल

माजगाव येथील धरण लवकरात लवकर पूर्ण होऊन पाणी प्रश्न निकाली निघावा यासाठी आमदार दीपक केसरकर यांनी सतत प्रयत्न केले आहेत. मात्र, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पाला गती देण्यासाठी वन विभागाने तातडीने झाडांचे मुल्यांकन करून नाहरकत दाखला देण्याची गरज आहे, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे. दरम्यान माजगाव येथील माजी पंचायत समिती सदस्य बाबू सावंत आणि अजय सावंत यांनी प्रकल्प वेळेत पूर्ण झाला पाहिजे म्हणून शेतकऱ्यांनी सहकार्य केले. प्रकल्पाला सहकार्य करूनही तो धिम्या गतीने सुरू आहे त्यामुळे लवकरच प्रकल्प होण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे अशी मागणी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg