loader
Breaking News
Breaking News
Foto

तलाठी संघटनेचा ऑनलाईन कामकाजावर राज्यस्तरीय बहिष्कार : तहसीलदारांना निवेदन

कोर्लई (राजीव नेवासेकर) - महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेच्या वतीने सोमवार दि. १५ डिसेंबर २०२५ पासून राज्यभर आयटी उपकरणांवरील ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. या राज्यस्तरीय व्यापक आंदोलनाचा एक भाग म्हणून मुरुड तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकारी यांनी तहसिलदार आदेश डफळ यांची भेट घेऊन तालुक्याच्या संपूर्ण टीमच्या वतीने निवेदन सादर केले. यावेळी राज्यस्तरीय निवेदनही तहसिलदारांकडे देण्यात आले असून,मंत्रालय स्तरावर या मागण्यांवर काय निर्णय होतो. याकडे लक्ष लागून राहिले आहे. मुरुड तालुका ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे अध्यक्ष अनिल ढोले यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मंडळ अधिकारी संजय बिक्कड (मुरुड), तुषार काकडे (बोर्ली), मंगेश इग्रुळकर (नांदगाव), उपलेखापाल संतोष कचरे,तलाठी संघटनेचे उपाध्यक्ष तथा मुरुड ग्राम महसूल अधिकारी राहुल जाधव यांसह सर्व ग्राम महसूल अधिकारी उपस्थित होते. तलाठी संघटनेच्या निवेदनानुसार, शासन निर्णय दि. ३० जुलै २०२१ नुसार ई-पिक पाहाणी कार्यक्रमात शेतकऱ्यांचा प्रत्यक्ष सहभाग वाढविणे, जनजागृती, प्रशिक्षण, नोंदणी व पर्यवेक्षण ही प्रमुख जबाबदारी कृषि विभागाची आहे,मात्र प्रत्यक्षात ही संपूर्ण जबाबदारी ग्राम महसूल अधिकारीव मंडळ अधिका-यांवर टाकली जात असल्याने अतिरिक्त ताण निर्माण होत आहे, असे संघटनेचे म्हणणे असून सध्या तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडे असलेली आयटी उपकरणे जीर्ण व निकामी झाल्याने कामकाजात मोठ्या अडचणी येत आहेत.

टाइम्स स्पेशल

त्यामुळे तातडीने नवीन लॅपटॉप तसेच प्रिंटर-कम-स्कॅनर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. या मागण्या मान्य होईपर्यंत सर्व ग्राम महसूल व मंडळ अधिकारी आपली डिजिटल सिग्नेचर (डीएससी) तहसिल कार्यालयात जमा करून संपूर्ण ऑनलाईन कामकाजावर बहिष्कार टाकत असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. या आंदोलनामुळे ७/१२, ८-अ दाखला प्रणाली, ई-फेरफार ई-फिक पाहाणी नोंदणी यांसारख्या महत्वाच्या अनिलाईन सेवांवर तात्पुरता परिणाम होण्याची शक्यता आहे. तलाठी संघटनेने शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg