loader
Breaking News
Breaking News
Foto

किक बॉक्सिंग स्पर्धेत वाफोलीचा भावेश राज्यात द्वितीय

बांदा (प्रतिनिधी) - बांदा येथील खेमराज हायस्कूलमध्ये बारावीला शिक्षण घेत असलेला भावेश भगवान गवस याने किक बॉक्सिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत शाळेचा व गावाचा नावलौकिक वाढवला आहे. कोल्हापूर येथे झालेल्या विभागीय किक बॉक्सिंग स्पर्धेत भावेशने प्रथम क्रमांक पटकावला, तर गोंदिया येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत त्याने राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून यशाची पुनरावृत्ती केली. या यशामागे खेमराज हायस्कूलचे शिक्षक सुमेधा सावळ यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच विलवडे हायस्कूलचे क्रीडा शिक्षक बांदेकर यांच्यासह अमित पालव, रोहन पाटील आणि ऋतिक सावंत यांचे मोलाचे सहकार्य भावेशला मिळाले. योग्य प्रशिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि शिक्षकांचे प्रोत्साहन यामुळे भावेशने ही कामगिरी साध्य केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वाफोली गावातील शेतकरी कुटुंबातील भावेशच्या या यशाबद्दल सरपंच उमेश शिरोडकर आणि उपसरपंच विनेश गवस यांनी भावेशच्या घरी जाऊन त्याचे तसेच त्याच्या आई-वडिलांचे अभिनंदन केले. त्यांनी भावेशच्या पुढील क्रीडा वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या. यावेळी भावेशचे वडील भगवान गवस, आई भक्ति गवस, निवृत्त शिक्षक मनोहर गवस, भिवा गवस, तृषाल गवस, ओंकार गवस, सदानंद गवस, जयेश गवस आदी उपस्थित होते. भावेशच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg