loader
Breaking News
Breaking News
Foto

हातखंबा येथे रिक्षाला ट्रकची धडक; ३ जखमी

रत्नागिरी (वार्ताहर) : मुंबई-गोवा महामार्गावर हातखंबाजवळील आरटीओ कॅम्पसमोर रिक्षा व ट्रकच्या धडकेने झालेल्या अपघातात तिघेजण जखमी झाले. सोमवारी सकाळी ११ वा.च्या सुमारास हा अपघात झाला.या अपघातामुळे हातखंबा-पाली मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.अपघाताविषयी पोलिसांकडून पत्रकारांना देण्यात आलेल्या माहितीनुसार, पालीकडून जाणार्‍या रिक्षेला मागून येणार्‍या ट्रकने जोरदार धडक दिली. ही धडक बसताच रिक्षा पलटी झाली. या अपघातात रिक्षाचालकासह दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले. तिथेच कॅम्पमध्ये असणारे आर टी ओ विभागाच्या अधिकार्‍यांनी आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पोलिसांसह स्थानिक नागरिकांनी जखमींना तत्काळ हातखंबा येथील जगद्गुगुरू नरेंद्र महाराज नाणीज धामच्या रुग्णवाहिकेमार्फत रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले. चंद्रकांत रामचंद्र कांबळे (वय ५०), मानसी चंद्रकांत कांबळे (वय ४६) व नितेश गंगाराम कांबळे (वय ४०, तिघेही राहणार मुक्काम पोस्ट अडवली, हसाळ बौद्धवाडी, तालुका लांजा) अशी या अपघातात जखमी झालेल्यांची नांवे आहेत. सध्या तिघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, हातखंबा ते पाली या महामार्गावरील अपघातांची मालिका अद्याप थांबलेली नसून, वेगमर्यादा, वाहतूक शिस्त व सुरक्षिततेबाबत उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने केली जात आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg