loader
Breaking News
Breaking News
Foto

शाळा चाफवली नं. 1 शाळेचे क्रीडा स्पर्धांमध्ये घवघवीत यश

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील चाफवली शाळा नं.1 यांनी सन 2025/ 2026 या केंद्रस्तरीय व बीटस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये अत्यंत घवघवीत यश प्राप्त केले आहे. चाफवली नं.1 /देवळे नं.1च्या केंद्रस्तरीय कबड्डी लहान गट मुलगे यांच्या संयुक्त संघाने कमालच केली. या फेरीतील सलग चार सामने जिंकत अंतिम विजेतेपद पदावर मोहर कायम केली. यामध्ये शौर्य कांबळे, भावेश बोडेकर, सर्वेश चव्हाण या खेळाडूंचा खेळ बहारदार व उत्कंठावर्धक झाला. पण एका महत्त्वाच्या क्षणी देवळ्याच्या इ. 1ली तील विहान मांगलेकर या छोट्या खेळाडूंने निर्णयाक चढाईत कमाल करून संघाला महत्त्वपूर्ण योगदान दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी खो-खो मोठा गट मुली चाफवली शाळा नं.1 ला उपविजेतेपद प्राप्त केले. बीट स्तरीय स्पर्धेत केंद्र देवळेच्या संघ म्हणून चाफवली नं.1/देवळे नं.1 लहान गट कबड्डी मुलगे यांनी उपविजेते पदापर्यंत धडक देऊन आपल्या कौशल्यपूर्ण खेळाची चुणूक दाखवली. तर मुलींच्या मोठा गट कबड्डी देखील चाफवलीच्या देवळे केंद्राच्या संघाने उपविजेतेपद प्राप्त केले आहे. आता तालुकास्तरीय स्पर्धांसाठी शौर्य कांबळे, भावेश बोडेकर लहान गट मुलगे आर्या कांबळे मोठा गट मुली या खेळाडूंची कबड्डी खेळासाठी तालुकास्तरावर निर्विवाद निवड झाली आहे.

टाइम्स स्पेशल

केंद्रस्तरीय स्पर्धेत शौर्य कांबळे यांने गोळा फेक वैयक्तिक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. एकंदर चाफवली नं. 1 यांनी आपल्या शाळेच्या खेळ परंपरेला साजेसा पराक्रम करत यावर्षी देखील क्रीडा यश मिळविले आहे. या खेळांसाठी मार्गदर्शक म्हणून गजानन मोघे, नीलम सोलापूरे, संगीता मगदूम आणि पालक सदस्य 6 वर्गातून संजय चाळके, आदित्य चाळके आणि चिंतन कांबळे यांचे देखील विशेष मार्गदर्शन लाभले आहे. शाळेच्या या उत्तुंग यशाबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg