loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात

आबलोली (संदेश कदम) - मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान 2025 - 26 या अभियानांतर्गत गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत ग्रामपंचायत आबलोली येथे ग्रामपंचायतच्या संयुक्त विद्यमाने ॲनिमिया मुक्त भारत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये महिला पुरुष आणि शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी, मधुमेह तपासणी, आणि आरोग्य तपासणी करण्यात आली. या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये आबलोली येथील महिला, पुरुष आणि विद्यार्थी विद्यार्थिनींनी बहुसंख्येने आपली आरोग्य तपासणी करून घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी निर्मल ग्रामपंचायत आबलोली येथे या शिबिराचा उदघाटन सोहळा उत्साहात संपन्न झाला. यावेळी निर्मल ग्रामपंचायत आबलोली यांच्या वतीने येणाऱ्या महिला, पुरुष, ग्रामस्थांचे आणि विद्यार्थ्यांचे, विद्यार्थिनींचे उत्साहात स्वागत करण्यात आले. आरोग्य तपासणी शिबीर याबद्दल ग्रामपंचायत अधिकारी बाबुराव सूर्यवंशी, प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोलीचे आरोग्य निरीक्षक महेश जांभळे, सरपंच वैष्णवी नेटके यांनी मौलिक मार्गदर्शन केले.

टाइम्स स्पेशल

या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र आबलोली यांच्या वतीने आरोग्य निरीक्षक महेश जांभळे, आरोग्य सेविका सी. के. वासावे, आरोग्य सेवक जी.आर. केंद्रे, आशा सेविका विशाखा कदम, सानिदया रेपाळ, योगेश भोसले, रेणुका पवार यांनी विशेष प्रयत्न केले. यावेळी दत्ताराम कदम, ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश बाईत, पंचायत समिती गुहागरच्या पर्यवेक्षिका आणि नोडल अधिकारी स्नेहा जाधव, बचत गटाच्या सी.आर. पी. मीनल कदम, वेदिका पालशेतकर, अंगणवाडी सेविका रिया रेपाळ, प्रिया कदम, मैथिली भाटकर, विनीता विलास बाईत, राजवी बाईत, कीर्ती निमुणकर, अपर्णा कदम, अर्चना जाधव आदी उपस्थित होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg