loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी जिल्हयातील १०२ कंत्राटी डॉक्टरांचे आर्थिक आरोग्य बिघडले

रत्नागिरी - एमबीबीएस डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने रत्नागिरी जिल्हयातील कोलमडलेली आरोग्य यंत्रणा कंत्राटी बीएएमएस डॉक्टर सांभाळत आहेत. मात्र या १०२ डॉक्टरांना गेले पाच महिने पगारच मिळालेला नाही. त्यामुळे या डॉक्टरांचे आर्थिक आरोग्य सरकारने बिघडविले असल्याचा आरोप होतो आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी जिल्हयात ६७ प्राथमिक आरोग्य केंद्रे व दोन उपजिल्हा रुग्णालये आहेत. एमबीबीएस डॉक्टर या ग्रामीण भागामध्ये सेवा देण्यासाठी येत नाहीत. त्यामुळे एमबीबीएस डॉक्टरांची पदे जिल्हयात रिक्त आहेत. रिक्त पदांमुळे जिल्हयाच्या ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे. ही यंत्रणा सावरण्यासाठी बीएमएस डॉक्टरांना कंत्राटी पद्धतीवर नेमण्यात आले आहे. एकुण १०२ डॉक्टरांची अशा पद्धतीने नियुक्ती करण्यात आली आहे. २४ तास ते काम करतात. प्रतिमहा ४० हजार रुपये त्यांना शासन देते. मात्र गेली ५ महिने त्यांना वेतन मिळालेले नाही. तसेच जेव्हा मिळाले तेव्हा ते वेळेवर मिळाले नाही त्यामुळे त्या डॉक्टरांचे आर्थिक आरोग्य बिघडलेले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg