loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्हास्तरीय स्पर्धेत एम.आय.बी.गर्ल्स ठरली प्रथम

संगलट (खेड)( इक्बाल जमादार) - खेड-शहरातीलबज्म-ए-इमदादीयाच्या एम.आय.बी.गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थिनींनी 15 डिसेंबर 2025 रोजी महाराष्ट्र हायस्कूल चिपळूण येथे आयोजित रत्नागिरी-सिंधुदुर्ग कोकण टॅलेंट फोरमच्या जिल्हास्तरीय स्पर्धेत भाग घेताना सहभागी 18 शाळांमध्ये पुन्हा एकदा नंबर वन येताना फिरत्या चषकावर स्वतः च्या शाळेचे नाव कोरले. निबंध लेखन इंग्रजीत सल्वा शाहजहान मुल्ला तर मराठीत निदा इलयास मणियार यांनी प्रथम क्रमांक मिळविला. बुध्दीमत्ता चाचणीत आलीया मनसुर मुल्लाजी आणि सिरत दिलदार पेडेकर यांनी द्वितीय येण्याचा मान मिळविला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सामान्यज्ञानमध्ये मनाल जावीद चौगले तर इंग्रजी व्याकरणात सिदरा सलीम माखजनकर यांनी उत्तेजनार्थ पुरस्कार प्राप्त केले. तमन्ना शेख, खदीजा चिपळूणकर, उमेरा बेग, हाफीजा खोत व बतूल शेख यांनीही चमकदार कामगिरी केली.यशस्वी विद्यार्थिनींना प्रशालेतील शिक्षक झियाऊर रहमान खान, विजय मोहिते, निलोफर काझी, नाझीमा महाते, स्नेहल खेडेकर व सदफ चिकटे यांचे मार्गदर्शन लाभले होते. या सर्वांचे माननीय संस्थाध्यक्ष ए.आर.डी खतीब सर, सर्व संस्था सदस्य, मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर मॅडम, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थिनींनी अभिनंदन केले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg