loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीत जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात, ९७ स्पर्धकांचा सहभाग

संगलट खेड( इक्बाल जमादार) - दापोली स्क्वेअर चेस अकॅडमी यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा गट ७ ते १९ अंतर्गत मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेचे उद्घाटन रम्य जीवन ज्येष्ठ नागरिक कट्ट्याच्या अध्यक्षा विजया तोडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रकांत पवार, मोहन राऊत चंद्रकांत इंनकर प्रमोद धारप, विमल जाधव तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे कुलदीप गजानन चौगुले, राजश्री फडके, सातपुते आनंद कोकणचे पिल्ले उपस्थित होते. या जिल्हास्तरीय स्पर्धेत एकूण ९७ स्पर्धकांनी सहभाग नोंदवला होता. खेड, चिपळूण, दापोली, गुहागर, रत्नागिरी, संगमेश्वर लांजा, राजापूर, व मंडणगड आदी तालुक्यांमधून स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अत्यंत रंगतदार आणि चुरशीच्या सामन्यांमध्ये विविध वयोगटांतील विजेते पुढीलप्रमाणे U-7 गट: प्रथम – देवांश चेतन शिंदे द्वितीय – आयुष अरुण वाघमोडे तृतीय – तितिक्षा यशवंत पवार U-9 गट: प्रथम – तनुश चेतन शिंदे द्वितीय – शुभम राजन कोठारकर तृतीय – चिन्मय सचिन देवरुखकर U-11 गट: प्रथम – अब्दुल्ला एम. हारिफ बुरोडकर द्वितीय – ओम निलेश खामकर तृतीय – विपुल क्रांतीदूत फडके U-15 गट: प्रथम – श्रेयस राहुल उगले द्वितीय – पार्थ योगेश लिमये तृतीय – सहर्ष सचिन टोकले U-19 गट: प्रथम – श्रीहस निलेश नुरकर द्वितीय – पारस राजेश राजवडकर तृतीय – अमित मेहता

टाइम्स स्पेशल

या स्पर्धेचे अध्यक्ष आशिष कोवळे, आयोजक स्पर्धाप्रमुख मुख्य आर्बिटर म्हणून विनायक माने यांनी काम पाहिले, तर सहआर्बिटर म्हणून श्रेया सोनकर आणि अथर्व आशिष कोवळे साहस नाडकर यांनी जबाबदारी पार पाडली. सर्व विजेत्यांना रोख रक्कम, आकर्षक चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. विशेष बाब म्हणजे या स्पर्धेत दापोली स्क्वेअर चेस अकॅडमी दहा स्पर्धकांनी घवघवीत यश संपादन केले. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल पालक, खेळाडू व उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg