loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्ह्यातील पुष्कराज स्पोर्ट्स शूटिंग अकॅडेमी चे ११ नेमबाज राष्ट्रीय स्पर्धेसाठी रवाना

रत्नागिरी (जमीर खलफे) - ६८ वी राष्ट्रीय शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा ११ डिसेंबर ते ४ जानेवारीदरम्यान भोपाळ येथे आयोजित केली आहे. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी जिल्ह्यातील पुष्कराज स्पोर्ट्स शूटिंग अकॅडेमी चे ११ नेमबाज रवाना झाले आहेत. ५० मीटर रायफल प्रकारात रत्नागिरीतील दिग्विजय आनंद चौगुले (नवनिर्माण हायस्कूल), सोहम जीवन जाधव (सेंट थॉमस हायस्कूल), साहिल उल्हास मुळये (जाकादेवी), ऐश्वर्य दिनेश सावंत (सडामिऱ्या), सिद्धी कासार (खंडाळा), देवर्षि कासार (जिंदाल विद्या मंदिर,जयगड), तसेच श्रीवर्धन रायगड येथून रत्नागिरी येथे नेमबाजी शिकायला आलेला पार्थ परेश तोडकर, तसेच पुणे व पिंपरी चिंचवड येथून आलेल्या कुमुदिनी संदेश तनपुरे आणि हर्षदा प्रशांत तनपुरे हे सर्व एम. पी. शूटिंग अकादमी भोपाळ येथील स्पर्धेत सहभागी होतील, हे सर्व नेमबाज पुष्कराज स्पोर्ट्स शूटिंग अकॅडमी, येथे भारतीय क्रीडा प्राधिकरण मान्यताप्राप्त ग्रेड ए कोच राजेश्वरी पुष्कराज इंगवले व आंतरराष्ट्रीय परवानाधारक प्रशिक्षक पुष्कराज जगदीश इंगवले यांच्याकडून मार्गदर्शन प्राप्त करतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg