loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा येथिल वर्षा चव्हाण यांचा स्वतंत्र कोकण राज्य अभियान तर्फे 'कोकणरत्न' पुरस्काराने सन्मान

मुंबई (सुरेश सप्रे) लांजा-रत्नागिरीच्या सुकन्या वर्षा चव्हाण यांना स्वतंत्र कोकण अभियान तर्फे दिला जाणारा 'कोकणरत्न' पुरस्कार आझाद मैदान येथिल पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमात मान्यवरांचे हस्ते प्रदान करण्यात आला. उबाठा शिवसेनेच्या सहसंर्पक प्रमुख वर्षा चव्हाण या बदलापूर शहराच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात एक तरूण तडफदार युवा नेतृत्व असून विविध संस्थांच्या माध्यमातून कार्यरत आहेत. सामाजिक कामाची आवड व बांधिलकी यांचा संगम साधत वर्षा चव्हाण यांनी आपल्या कार्याची सुरुवात लांजा- रत्नागिरीतुन केली. त्यांनी सुरुवातीला स्फुर्ती फाउंडेशन संस्थेतून विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला.महिला सक्षमीकरण, आरोग्य शिबिरे, जनजागृती मोहिमा आणि आंदोलनांमध्ये त्यांनी सातत्याने छाप सोडली आहे. सामाजिक कार्यातल्या त्यांच्या योगदानामुळे त्यांचा जनसंपर्क वाढला आणि त्याच काळात त्यांनी राजकीय क्षेत्रात पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

संस्थात्मक कामाची सुरुवात केल्यानंतर २०२२ मध्ये त्यांनी शिवसेना महिला आघाडी उपशाखा प्रमुख म्हणून राजकीय कारकीर्द सुरू केली. त्यांची काम करण्याची पद्धत, संवादकौशल्य आणि महिलांसाठी केलेली सातत्यपूर्ण धडपड यामुळे अल्पावधीतच त्यांना मोठ्या जबाबदाऱ्या मिळू लागल्या. २०२३ मध्ये त्यांची शिवसेना उपशहर संघटिका म्हणून निवड झाली. २०२५ मध्ये उबाठा शिवसेना महिला आघाडीच्या बदलापूर पूर्वेच्या संपर्कप्रमुख पदासाठी त्यांची नियुक्ती करण्यात आली. पक्ष संघटनेमध्ये तळागाळात जाऊन केलेल्या त्यांच्या सक्रिय कार्यामुळे त्यांनी तडफदार नेतृत्व म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. राजकारणा सोबतच वर्षा चव्हाण यांचा सामाजिक आणि मानवाधिकार क्षेत्रातील सहभागही उल्लेखनीय आहे. त्या कोकण युवा सेवा संस्थेच्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार ह्यूमन राईट्स संघटनेच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्षा म्हणून काम करत आहेत. त्यांचा सामाजिक बांधिलकीचा व्यापक दृष्टीकोन अधोरेखित होतो.

टाइम्स स्पेशल

त्यांच्या कार्याची दखल घेत अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. कोकणातील लांजा तालुक्यातील सुकन्या असलेल्या वर्षाताई बदलापूर सारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरात सामाजिक आणि राजकीय कार्यात अग्रेसर आहेत. युवा नेतृत्व म्हणून वर्षा चव्हाण आज नव्या पिढीच्या महिलांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरत आहेत. पुढील काळात मुंबई आणि कोकणातील महिलांसाठी नवीन संधी,नवीन उपक्रम आणि सशक्ततेच्या दिशेने व्यापक कार्य करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg