loader
Breaking News
Breaking News
Foto

पोलिसांची मोठी कारवाई, ३ सराईत गुन्हेगार हद्दपार

रत्नागिरी (वार्ताहर) :- जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आणि गुन्ह्यांवर प्रतिबंध घालण्यासाठी रत्नागिरी पोलिसांनी (महाराष्ट्र पोलीस) ठोस आणि परिणामकारक कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी दिलेल्या आदेशांनुसार, रत्नागिरी शहर आणि लांजा पोलीस ठाणे हद्दीतील एकूण ३ सराईत गुन्हेगारांवर दोन वर्षांसाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी शहर पोलीस ठाणे हद्दीतील २ सराईत गुन्हेगार, सलमान उर्फ आकाश अशोक डांगे आणि आमिर नजिर मुजावर, यांच्यावर हद्दपारीची मोठी कारवाई करण्यात आली आहे. सलमान उर्फ आकाश डांगे (रा. थिबा पॅलेस माळ नाका, रत्नागिरी) याच्यावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे तसेच अंमली पदार्थ विक्रीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो अंमली पदार्थ विक्रीमध्ये सराईत असल्याने शहरातील अनेक तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात होती, ज्यामुळे समाजजीवनावर विपरीत परिणाम होत होता. आमिर नजिर मुजावर (रा. राजीवडा नाका, रत्नागिरी) याच्यावर गंभीर गुन्हे तसेच महिलांविरुद्धचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या दोघांचीही गुन्हे करण्याची प्रवृत्ती बळावल्याने, त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) अन्वये हद्दपारीचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी यांच्याकडे सादर करण्यात आला होता.

टाइम्स स्पेशल

उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश माईनकर आणि पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या पाठपुराव्यानंतर, उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, रत्नागिरी यांनी या दोघांना दोन वर्षांकरिता रत्नागिरी जिल्ह्यासह सिंधुदुर्ग, रायगड व कोल्हापूर या चार जिल्ह्यांतून हद्दपार करण्याचे आदेश काढले आहेत. लांजा पोलीस ठाणे हद्दीमधील सराईत गुन्हेगार गुरुनाथ यशवंत तावडे (रा. शिपोशी, हनुमानवाडी, ता. लांजा, जि. रत्नागिरी) याच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. गुरुनाथ यशवंत तावडे याच्यावर लांजा पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम ६५ आणि भा.दं.वि. कलम ४५७, ३८० (घरफोडी व चोरी) सारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg