loader
Breaking News
Breaking News
Foto

आबलोली येथील श्री नवलाई देवीचा गोंधळ उत्साहात आणि जल्लोषात साजरा

आबलोली (संदेश कदम) - देव दिवाळीनंतर ग्रामदेवतेचा गोंधळ घालण्याची परंपरा कोकणात आहे. कोकणातील प्रत्येक गावात या दिवसात ग्रामदेवतेचे गोंधळ घातले जातात. ग्रामदेवता आणि सर्व देवतांना प्रसन्न करण्यासाठी हे गोंधळ घातले जातात अशी आख्यायिका सांगितली जाते. अशीच गोंधळ घालण्याची परंपरा कोकणात सुप्रसिद्ध आहे. गुहागर तालुक्यातील आबलोली गावची ग्रामदेवता श्री नवलाईदेवी श्री नवलाई देवी मंदिर आबलोली येथे उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी नवलाई देवीच्या भक्तांच्या आनंदाला उधाण आले होते. आबलोली गावातील भक्त तसेच ग्रामस्थ महिला बंधू भगिनी आणि बालके या गोंधळ सोहळ्यात बहूसंख्येने सहभागी होतात. नवलाई देवीला साकडे घालून घरातील मंगल कार्य निर्विघ्नपणे पार पडावी, सर्वांना सुखी ठेव अशी आराधना करतात.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मानकरी, गावकरी, पूजारी यांच्या हस्ते नवलाई देवीची मनोभावे पूजा करून नवलाई देवी समोर मानकरी, गावकरी महिला, पुरुष, बालके नतमस्तक होतात. उपस्थित सर्वांनी हुकूम दिल्यानंतर गोंधळ घालणारे गोंधळी गाणी म्हणतात आणि पुरुष मंडळी गावकरी दिवटे घेऊन त्याच्यावर नाचतात. यालाच गोंधळ धन्य असे म्हणतात. या गोंधळात देवीचा जबरदस्त जागर केला जातो. बरोबर हा कार्यक्रम नवलाई देवीच्या देवळात साजरा केला जातो. गोंधळ झाल्यानंतर संपूर्ण गावासाठी गावकऱ्यांनीच बनवलेल्या जेवणाची व्यवस्था केलेली असते. हे जेवण सर्व समाजातील लोक एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने जेवतात. जेवणाचा आस्वाद घेतात. त्यानंतर गोंधळ घालणारी मंडळी संबळ वाजवून देवीची गाणी म्हणतात, देवतांची कथाही सांगतात. गोंधळ उत्सव पडल्यानंतर दोन दिवसांनी गावातून बळ काढली जाते. त्यानंतर बळीराजा, शेतकरी राजा आपल्या शेतीच्या कामांना प्रारंभ करतात कवळ तोडणे, गवत काढणे अशा शेतीच्या कामांना सुरुवात होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg