loader
Breaking News
Breaking News
Foto

वरवेली येथील जि. प. शाळा नं.१ च्या शतकमहोत्सव विविध कार्यक्रमाने साजरा होणार

वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील वरवेली येथील जि. प.शाळा वरवेली नं.१ च्या शतकमहोत्सवी वर्षा निमित्त रविवार दि.२८ डिसेंबर २०२५ रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वरवेली येथील जि. प. शाळेच्या स्थापनेला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. सन १९२५ मध्ये गावातील त्यावेळच्या शिक्षण प्रेमी यांनी शाळेची स्थापना झाली.१९२५ मध्ये अमृतराव प्रतापराव विचारे यांचे घर जुन्या शाळेच्या इमारती ठिकाणी होती ते जूने घर अमृतराव विचारे यांच्या मुलांनी म्हणजेच कै.भगवंतराव, कै.दाजीराव, कै.गंगाजीराव व कै.सावळाराम विचारे यांनी शाळेसाठी वापरावयास विनामूल्य दिले होते .कोल्हापूर संस्थानामध्ये इंजिनियर असणारे रावबहाद्‌दुर दाजीराव अमृतराव विचारे यांनी याच आपल्या जुन्या घरात शाळा सुरु केली, त्याकाळी मॅट्रिक पास असलेले भगवंतरावांचे चिरंजीव पांडुरंगराव विचारे हे शाळेचे विनामूल्य शिक्षकाचे काम पाहू लागले. हाडाचे शिक्षक असलेले या शाळेचे पहिले शिक्षक बनले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच वरवेली ग्रामपंचायती मध्ये पहिले सरपंचही बनले तर श्री हसलाई देवस्थानचे पहिले मानकरी ही बनले. सदरची शाळा ५० वर्षे अखंडपणे चालू होती.इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतचे वर्ग व ३५० विद्यार्थी संख्या असल्याने शाळेत बसावयास जागा अपूरी पडत होती, त्यामुळे गावातील ग्रामस्थ शाळेसाठी जागा शोधू लागले. सन १९७४ साली कै. लक्ष्मीबाई धोंडबाराव विचारे यांनी आताची शाळेची इमारत असलेली २५ गुंठे क्षेत्र विनामूल्य जिल्हा परिषदेच्या शाळेकरिता दिली. त्यानंतर १९७८ मध्ये खालची वाडी येथे मुलांना येणेजाणे त्रासाचे होत असल्याने ग्रामस्थानी दुसरी शाळा खालची वाडी येथे उभारली, त्या शाळेत इयत्ता १ ली ते ४ थी पर्यंत होती. पाचवी पासून सर्व विद्यार्थी या शाळेत शिकू लागली. गावात दोन शाळा कार्यरत झाल्या.

टाइम्स स्पेशल

या शाळेतून शिकून गेलेले अनेक विद्यार्थी मोठ मोठ्या पदावर कार्यरत होते व आताही आहेत. सर्व माजी विद्यार्थी या शाळेसाठी नेहमीच सहकार्य करत असतात. आज या शैक्षणिक दृष्ट्या प्रगतशील शाळेमध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. येथील शाळेचे मुख्याध्यापक समीर पावसकर, शिक्षक ज्ञानेश्वर वाघमारे, अर्चना वाकडे हे सर्व ज्ञानदानाचे उत्तम कार्य करत आहेत. शाळा व्यवस्थापन समिती त्याचप्रमाणे गावातील ग्रामस्थ यांचे नेहमीच या शाळेला सहकार्य मिळत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg