loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचा आध्यात्मिक सत्संग सोहळ्यात यथोचित सन्मान

खोपी, खेड (दिलीप देवळेकर) - लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने समाजोपयोगी, शैक्षणिक, आरोग्यविषयक तसेच सेवा भावनेतून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची दखल घेत खोपी येथे आयोजित भव्य आध्यात्मिक सत्संग सोहळ्यात क्लबचा यथोचित सन्मान करण्यात आला. कणेरी मठाचे मठाधिपती परमपूज्य अदृश्य काडसिधेश्वर महाराज यांच्या शुभहस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला. या प्रसंगी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांच्या साक्षीने हा कार्यक्रम अतिशय भक्तिमय आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला. लायन्स क्लब ऑफ खेड सिटी गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील गरजू घटकांसाठी विविध उपक्रम राबवत आहे. आरोग्य शिबिरे, रक्तदान शिबिरे, शैक्षणिक साहित्य वाटप, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, पर्यावरण संवर्धन, गरिबांसाठी मदतकार्य अशा अनेक उपक्रमांमुळे क्लबने समाजात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सातत्यपूर्ण कार्याची दखल घेत आध्यात्मिक व्यासपीठावर क्लबचा सन्मान करण्यात आल्याने उपस्थितांमध्ये समाधानाची भावना व्यक्त झाली. या वेळी लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ समाजनेते रोहनशेठ विचारे यांनाही विशेष सन्मानाने गौरविण्यात आले. अदृश्य काडसिधेश्वर महाराज यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करताना सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कार्याचे कौतुक करण्यात आले. महाराजांनी आपल्या प्रवचनात सेवा हीच खरी साधना असल्याचे सांगत, समाजासाठी निःस्वार्थ भावनेने काम करणाऱ्या संस्था आणि व्यक्ती समाजाला योग्य दिशा देतात, असे मत व्यक्त केले. या कार्यक्रमास लायन्स क्लबचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, मान्यवर नागरिक तसेच मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

सत्संग सोहळ्याच्या माध्यमातून आध्यात्मिक विचारांसोबतच सामाजिक कार्याचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी लायन्स क्लबच्या कार्याची प्रशंसा करत भविष्यातही असेच उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबवावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाच्या दरम्यान भक्तिमय वातावरणात अभंग, भजन आणि प्रवचनातून अध्यात्माची अनुभूती उपस्थितांना मिळाली. सन्मान सोहळ्यानंतर लायन्स क्लबच्या वतीने अदृश्य काडसिधेश्वर महाराज यांचे आभार मानण्यात आले. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन सेवा आणि अध्यात्म यांची सांगड घालावी, हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg