loader
Breaking News
Breaking News
Foto

दापोलीच्या गल्लीबोळात पोटासाठी मृत्यूशी झुंज! लहानगी सर्कसवाली तारीवर करतेय जीवघेणी कसरत

संगलट खेड( इक्बाल जमादार) - दापोली शहरातील गल्ली-बोळात सध्या एक हृदयद्रावक आणि मन हेलावून टाकणारे दृश्य पाहायला मिळत आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी आणि दारिद्र्याच्या अंधारातून बाहेर पडण्यासाठी एका लहानगी सर्कसवाल्या मुलीचा परिवार रस्त्यावर 'तारीवरची कसरत' हा जीवघेणा खेळ करत आहे. हा थरारक आणि तितकाच वेदनादायक संघर्ष पाहून दापोलीकरांचे डोळे पाणावले आहेत. शहरातील अनेक अंतर्गत रस्ते आणि लहान वसाहतींच्या जवळ हा विमुक्त भटक्या जमातीचा परिवार आपला तात्पुरता डेरा टाकून आहे. सुमारे आठ ते नऊ वर्षांची वाटणारी ही चिमुकली मुलगी, आपल्या आई-वडिलांच्या मदतीने, रस्त्यांच्या दोन टोकांमध्ये बांधलेल्या बारीक तारेवरून (रस्सीवरून) लीलया चालत आपले कौशल्य दाखवत आहे. तिच्या प्रत्येक पावलागणिक, 'ती पडणार तर नाही ना?' या भीतीने उपस्थितांच्या काळजाचा ठोका चुकत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तार धरण्यासाठी काठीचा वापर आणि खाली कोणताही सुरक्षा जाळीचा आधार नाही, यामुळे या कसरतीमधील धोका स्पष्टपणे जाणवतो. कसरत संपल्यावर हा परिवार उपस्थित लोकांसाठी एक छोटासा डबा घेऊन येतो. जमा होणाऱ्या चिल्लर पैशातूनच त्यांच्या कुटुंबाची चूल पेटते. या मुलीच्या वडिलांनी सांगितले की, "शारीरिक कष्ट करण्याशिवाय आम्हाला दुसरा कोणताही पर्याय नाही. पोटाची भूक भागवण्यासाठी आणि मुलांना जेवण देण्यासाठी आम्हाला दररोज हा धोका पत्करावा लागतो."

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg