loader
Breaking News
Breaking News
Foto

चिपळूण मध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूलच्या मार्गदर्शन शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

चिपळूण : रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड च्या वतीने द माधव सभागृह येथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला चिपळूण मधील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सदर शिबिराचे उद्घाटन रोटरी स्कूलचे चेअरमन बिपिनदादा पाटणे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. याप्रसंगी रोटरीच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, तसेच प्राध्यापक शुभम मुद्राळे, रोहन खेडेकर, कुणाल मंडलिक,आकसा कैस आदी मान्यवर उपस्थित होते. दहावीच्या विद्यार्थ्यांना भविष्यात आपली स्वप्न साकारायचे असतील तर अकरावी बारावीला असताना कष्टाशिवाय पर्याय नाही आणि ती दिशा देण्याचे काम रोटरी च्या माध्यमातून केले जाते. आज रोटरीच्या माध्यमातून विविध क्षेत्रांमध्ये यशस्वी विद्यार्थी चमकत आहेत याचा आम्हाला सार्थ अभिमान असून अशाच प्रकारे भविष्यात देखील यशस्वी विद्यार्थी घडविण्यासाठी रोटरी नेहमी अग्रेसर राहील असे प्रतिपादन चेअरमन बिपिनदादा पाटणे यांनी यावेळी मार्गदर्शन प्रसंगी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये 11 वी साठी प्रवेश घेण्यासाठी असणारी निवड चाचणी परीक्षा दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी गद्रे इंग्लिश मीडियम स्कूल चिपळूण या ठिकाणी होणार आहे. यावेळी प्राध्यापक रोहन खेडेकर, शुभम मुद्राळे, आकसा कैस यांनी इंजीनियरिंग, मेडिकल, आर्किटेक्ट, वाणिज्य, स्पर्धा परीक्षा, एनडीए तसेच अन्य क्षेत्रामध्ये जाण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रवेश परीक्षांच्या स्वरूपाबद्दल सविस्तर माहिती दिली. यासाठी असणारा अभ्यासक्रम याच्या बाबत देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी रोटरी स्कूलमधून ज्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले आहे अशांचे पालक व विद्यार्थी यांनी आपले मनोगत व्यक्त करताना यश प्राप्तीसाठी रोटरी च्या माध्यमातून कशा प्रकारे पाठबळ मिळाले याचा आवर्जून उल्लेख करताना रोटरीमध्येच प्रवेश घेण्याबाबत उपस्थित विद्यार्थ्यांना आवाहन केले.

टाइम्स स्पेशल

प्राध्यापक मंडलिक यांनी विद्यार्थ्यांचे समुपदेशन करताना यश मिळवण्यासाठी कष्टाशिवाय पर्याय नाही आणि त्यासाठी रोटरी ही यशस्वी विद्यार्थी घडविणारी एक फॅक्टरी आहे, असे देखील आवर्जून सांगितले. यावेळी उपस्थित पालक तसेच विद्यार्थी यांनी विचारलेल्या प्रश्नांना रोटरीच्या शिक्षक वर्गाने समर्पक उत्तर देऊन त्यांच्या शंकांचे निरसन केले. सदर प्रसंगी चिपळूण विविध शाळांमध्ये विद्यार्थी आणि पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg