loader
Breaking News
Breaking News
Foto

पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगढ येथील इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलमध्ये पांडुरंग काकतकर यांचा सहभाग

विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय भारत सरकारद्वारा पंजाब युनिव्हर्सिटी चंदीगढ येथे आयोजित देशातील सर्वात मोठ्या इंडिया इंटरनॅशनल सायन्स फेस्टिवलसाठी माऊली माध्यमिक विद्यालय सोनुर्लीचे विज्ञान शिक्षक तथा सिंधुदुर्ग जिल्हा विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर यांची निवड झाली. 6 ते 9 डिसेंबर या कालावधीत त्याना देशविदेशातील शिक्षणतज्ञ, शास्त्रज्ञ, अभ्यासक्रमाचे धोरणकर्ते, देशातील आय.आय.टी.चे प्रमुख, सायन्स सेंटर्सचे प्रमुख यांच्यासमवेत चर्चासत्रात सहभागी होऊन विचार मांडण्याची संधी प्राप्त झाली. सदर कार्यक्रमात नऊ प्रकारचे थिमॅटिक इव्हेंट्स होते. त्यातील एस्पायरिंग एज्युकेटर्स अँड टीचर्स गुरुकुला या इव्हेंटसाठी संपूर्ण देशभरातून नोंदणीकृत हजारो शिक्षकांमधून निकषपात्र शंभर शिक्षक निवडले. त्यात संपूर्ण महाराष्ट्रातून तीन तर कोकण विभागातून एकमेव यांची निवड झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आत्मनिर्भर भारत या संकल्पनेवर आधारित विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने पृथ्वी विज्ञान मंत्रालय, विज्ञान भारती,इस्रो यांच्या सहकार्यातून आयोजित केलेल्या जागतिक दर्जाच्या कार्यक्रमासाठी पंचकुला येथे दहा एकरहून अधिक जागेत सायन्स व्हिलेजची निर्मिती करण्यात आली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाचे केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंह सैनी, उद्योग आणि पर्यावरण, तसेच वन आणि वन्यजीव मंत्री राव नरबीर सिंह यांच्या उपस्थितीत शुभारंभ झालेल्या चार दिवसीय कार्यक्रमात चाळीसहून अधिक देशातील शिक्षणतज्ञ व शास्त्रज्ञ, उद्योजक तसेच विज्ञान क्षेत्रात कार्यरत हजारो इनोव्हेटर्स यांनी विविध विषयांवर विचार मांडले. यात विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयचे वैज्ञानिक सल्लागार अजय सूद, निती आयोग सदस्य तथा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ कुलपती डॉ. व्ही.के.सारस्वत, पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव डॉ.एम रविचंद्रन, डी.एस.आय.आर. आणि डी.जी., सी.एस.आय.आर.च्या सचिव डॉ.एन.कलायसेल्वी, विज्ञान तंत्रज्ञान मंत्रालयाचे सचिव अभय करंदीकर, जैवतंत्रज्ञान विभागाचे डॉ राजेश गोखले, इस्रोचे अध्यक्ष व्हि. नारायणन, डी.ए.इ.अध्यक्ष डॉ अजित मोहंती, आय.सी.ए. आर.चे सचिव मांगीलाल जाट, डी.आर.डी.ओ. अध्यक्ष समीर कामत,आय ए.एस. हरियाणा मुख्य सचिव अनुराग रस्तोगी,विज्ञान भारती अध्यक्ष डॉ.शेखर मांडे, विज्ञान भारती सचिव विवेकानंद पै, राष्ट्रीय सचिव डॉ शिवकुमार शर्मा, सचिव डॉ अरविंद रानडे, पंजाब विद्यापीठ कुलपती रेणू वीग यांनी मार्गदर्शन केले.

टाइम्स स्पेशल

काकतकर हे गेली अठ्ठावीस वर्षे ग्रामीण भागात विज्ञानाचा प्रचार प्रसार होण्यासाठी विविध उपक्रम राबवत असून आजतागायत त्यांनी विज्ञान विषयाच्या अध्यापनात पूरक असे ई लर्निंग, मिनी सायन्स सेंटर, सायन्स फेअर, अपूर्व विज्ञान मेळावा, विज्ञान नाट्य महोत्सव, विज्ञान प्रदर्शन, सायन्स ऑन व्हील, करियर गाईडन्स, व्हर्च्युअल रिॲलिटी असे अनेक उपक्रम घेतले आहेत. जिल्ह्यातील तसेच सीमाभागातील अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना विज्ञान प्रयोगांची प्रत्यक्ष हाताळणी करता यावी यासाठी सायन्स ऑन व्हील उपक्रम राबविण्यात महत्वपूर्ण योगदान दिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg