loader
Breaking News
Breaking News
Foto

भोईघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सोनाली महाडिक यांची बिनविरोध निवड

कोर्लई (राजीव नेवासेकर) - मुरुड तालुक्यातील दुर्गम ग्रामीण भागात असलेल्या भोईघर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सोनाली संजय महाडिक यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन केले जात आहे. भोईघर ग्रामपंचायतीचे प्रसाद चौलक‌र यांनी ठरल्याप्रमाणे उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या पदासाठी निवडणुक घेण्यात आली. यावेळी सोनाली महाडिक यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची सर्वानुमते बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी संतोष नागोठकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

जिल्हा परिषद माजी सदस्य सुबोध महाडिक, माजी तालूका पंचायत समिती सभापती रमेश नागावकर माजी सरपंच नथूराम महाडिक, संजय महाडिक, सुनील महाडिक, ग्रामपंचायत सरपंच हर्षद महाडिक, उपसरपंच प्रसाद चौलक‌र, सदस्य काशिनाथ वाघमारे, अजित महागावकर, रचना गोपाळे, सुचिता कासार, सोनाली महाडिक, विश्वास गोणबरे, हर्षला वणे, वनिता वाघमारे, ग्रामपंचायत अधिकारी संतोष नागोठकर, लेखनिक सचिन बिरवाडकर, शिपाई नितीन वाघमारे, संगणक परिचालक रुचिता सुडकू उपस्थित ग्रामस्थांनी सोनाली महाडिक यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करुन पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी सन.२०२३ मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत कै.सुभाष महाडिक यांचा ग्रामपंचायतीच्या प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी मोलाचे योगदान आणि सिंहांचा वाटा असल्याचा आवर्जून उल्लेख केला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg