loader
Breaking News
Breaking News
Foto

डंपरच्या धडकेत बैल जखमी; नागरिक व बजरंग दलाकडून तात्काळ उपचार

मालवण (प्रतिनिधी) - मालवण देऊळवाडा येथील महापुरुष मंदिर परिसरातील रस्त्यावर डंपरच्या धडकेत गंभीर जखमी झालेल्या बैलाला स्थानिक नागरिक व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी डॉक्टरांच्या मार्फत उपचार करत पुढील उपचारासाठी वैभववाडी येथील गोशाळेत पाठवले. देऊळवाडा येथील महापुरुष मंदिर परिसरातील रस्त्यावर एका बैलाला डंपरने धडक दिल्याने तो गंभीर जखमी झाला. अपघातानंतर रस्त्यावर पडलेल्या बैलाला स्थानिक नागरिकांनी तात्काळ बाजूला हलवून सुरक्षित ठिकाणी नेले. यानंतर स्थानिकांनी बजरंग दल संयोजक गणेश चव्हाण यांना घटनेची माहिती दिली. चव्हाण यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अनिकेत फाटक यांना बोलावून घेतले. दोघांनी मिळून जखमी बैलाच्या मालकाचा शोध घेतला; मात्र बैल कोणाचा आहे हे समजू शकले नाही.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानंतर पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रजत दळवी यांना पाचारण करण्यात आले. प्राथमिक तपासणीनंतर त्यांनी अधिक उपचारासाठी वैभववाडी येथील गाय-वासरू गोशाळा, खांबाळे येथे बैलाला हलविण्याचा सल्ला दिला. त्यानुसार अनिकेत फाटक यांनी गोशाळेशी संपर्क साधून स्व:खर्चाने जखमी बैलाला तेथे उपचारासाठी पाठविले. यावेळी गणेश चव्हाण, अनिकेत फाटक, भाऊ सामंत, स्वप्नील घाडी, प्रसाद हळदणकर, श्रीनाथ निकम, विकास गोवेकर तसेच श्री महापुरुष बाळ गोपाळ मित्रमंडळाचे सदस्य उपस्थित होते. या प्रसंगी दाखविलेल्या सामाजिक जाणिवा व तत्परतेबद्दल स्थानिक नागरिकांच्या वतीने अनिकेत फाटक, गणेश चव्हाण व डॉ. रजत दळवी यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg