loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभववाडी तालुक्यातील श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आयुर्वेदिक महाविद्यालय सुरू

वैभववाडी (प्रतिनिधी) - वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी गावा सारख्या ग्रामीण भागात श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आयुर्वेदिक महाविद्यालय (बी एम एस आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज) सुरू झाले असून या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा स्वागताचा कार्यक्रम नुकताच आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या सभागृहात संपन्न झाला. यावेळी संस्थेचे संचालक संदीप पाटील प्रशासकीय अधिकारी सुधाकर येवले आयुर्वेदिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मनोज कुमार पाटील, उप प्राचार्य डॉ. पताडे तसेच डॉ.महेश जयवंत पाटील, हॉस्पिटलचे सुपरटेंडंट डॉ. सौदात्ती, आधी विद्यार्थी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

वैभववाडी तालुक्यातील सांगुळवाडी सारख्या ग्रामीण भागात अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संस्थेने मेडिकल कॉलेज व 100 खोटांचे श्री राजन पाटील आयुर्वेदिक रुग्णालय सुरू केले आहे. प्रथम सुरू होणारे मेडिकल कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे स्वागत समारंभाचा कार्यक्रम नुकताच मेडिकल कॉलेजच्या सभागृहात संपन्न झाला. या मेडिकल कॉलेजमुळे वैभववाडी तालुक्याला व वैभववाडी शहरातील बाजारपेठेला चांगली चालना मिळणार आहे.

टाइम्स स्पेशल

गेली अनेक वर्ष श्री अनगरसिद्ध शिक्षण प्रसारक मंडळ ही संस्था सांगुळवाडी सारख्या ग्रामीण भागात वेगवेगळ्या कॉलेजांची स्थापना करून विद्यार्थ्यांना शैक्षणिक दालन ओपन करून देत आहे. त्यामुळे या संस्थेच्या कार्याचा सर्वत्र अभिनंदन होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg