loader
Breaking News
Breaking News
Foto

जालगाव ते उंबर्ले रस्त्याचा दयनीय अवस्थेविषयी शिवसेना (उबाठा) पक्ष जालगाव विभागातर्फे सार्वजनिक बांधकाम, उपविभाग, दापोली यांना निवेदन

दापोली :- तालुक्यातील दापोली - दाभोळ मार्गावरील जालगाव ते उंबर्ले रस्त्याचा दयनीय अवस्थेविषयी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जालगाव विभागातर्फे सार्वजनिक बांधकाम, उपविभाग, दापोली यांना निवेदन सादर करीत आपल्या समस्या मांडल्या. निवेदन देताना रस्ते डागडुगी पुढील 15 दिवसात करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जालगाव विभागप्रमुख शैलेश पांगत यांचा नेतृत्वात करण्यात आली. अन्यथा 5 जानेवारी 2026 रोजी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी विभाग समन्वयक समिर पानवलकर, उपशाखाप्रमुख अशोक खळे, तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी राम काष्टे, सचिन खळे, निलेश खळे, शैलेश खळे, तसेच वाहनचालक प्रविण मेंगे, प्रभात जाधव, अतुल यादव आदी उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg