loader
Breaking News
Breaking News
Foto

सुभाष गोवेकर यांचा मुंबई येथे सत्कार

सावंतवाडी - स्वतंत्र कोकणराज्य अभियान या संघटनेतर्फे येथील निवृत्त प्राध्यापक तथा सामाजीक कार्यकर्ते प्रा. सुभाष गोवेकर यांना कोकणरत्न पदवी या पुरस्काराने गौरवण्यात आले. हा सोहळा नुकताच मुंबई येथील मराठी पत्रकार भवनात झाला. याच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे संजय कोकरे, धनंजय कुवेसकर, राजेंद्र सुर्वे, सुभाष राणे, दिलीप लाड आदी होते. कोकणातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणार्‍या मान्यवरांना यावेळी गौरवण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सेवानिवृत्त प्राध्यापक असलेल्या गोवेकर यांनी विविध संस्थांवर दिर्घकाळ काम केले. यात ग्राहक संरक्षण चळवळ, पर्यावरण, पायाभूत सुविधांच्या विकासासाठी सक्रिय संघटना, आरोग्य, इंडिया रेडक्रॉस सोसायटी, अहिल्या ट्रस्ट आदींमध्ये त्यांनी केलेले काम उल्लेखनिय ठरले. त्यांच्या या सगळ्या कार्याचा विचार करून हा पुरस्कार देण्यात आला. स्वतंत्र कोकण संस्थेचे संजय कोकरे यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यात पदक तसेच मानपत्राचा समावेश होता.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg