loader
Breaking News
Breaking News
Foto

भारती राजवाडे राज्यस्तरीय आई काव्य पुरस्काराने सन्मानित

देवळे (प्रकाश चाळके) - सीता ट्रस्ट आहिल्या नगर व समर्थ फाउंडेशन पुणे जिजाई बहुउद्देशीय सेवा संस्था कल्याण महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमांतर्गत राज्यस्तरीय आई हा काव्य महोत्सव साहित्यिक पुरस्कार सोहळा दिनांक 14 डिसेंबर 2025 रोजी वि.का. राजवाडे सभागृह भारत इतिहास संशोधन मंडळ सदाशिव पेठ पुणे येथे संपन्न झाला. प्रसिद्ध कवी कवियत्रींच्या आई या राज्यस्तरीय 1121 ग्रंथ पुस्तक कविता संग्रह असलेल्या साहित्य क्षेत्रातील पुरस्कार देवरूखच्या लेखिका, भारती राजवाडे यांना महाराष्ट्रात व्याख्याते म्हणून प्रसिद्ध असलेले निस्वार्थपणे काम करणारे समाजसेवक व्याख्याते गुरु संदीप पाटील यांच्या शुभहस्ते सन्मानपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच 1121 आई या पुस्तकात 500 हून अधिक पानांचा भव्य दिव्य ग्रंथपुस्तक काव्यसंग्रहात भारती राजवाडे यांच्या दहा साहित्य कविता प्रकाशित झाल्या आहेत. आई मातृत्वाच्या भावविश्वावर आधारित या काव्यसंग्रहात राज्यभरातून आलेल्या साहित्यिकांनी आपल्या आई विषयीच्या भावना प्रेम, त्याग, समर्पण, आणि कृतज्ञता इ. कवी– कवियत्रीने आपल्या भावना शब्दात साकारल्या आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे पद्मश्री राहीबाई पोपरे (बीजमाता )पद्मश्री दादा इदाते भटक्या विमुक्त विकास परिषद पद्मश्री पोपटराव पवार आचार्य सीए डॉक्टर शंकर अंदानी किरण इनामदार समर्थ फाउंडेशन संदीप पाटील बहुउद्देशीय सेवा संस्था इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत साहित्य पुरस्कार सोहळा संपन्न झाला.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg