loader
Breaking News
Breaking News
Foto

सोनगांव धामणदेवी घरडा कॉलनीजवळ देशी विदेशी दारुच्या बाटल्या जप्त, संशयितावर गुन्हा दाखल

खेड (वार्ताहर) - तालुक्यातील सोनगांव धामणदेवी घरडा कॉलनीजवळ येथील पोलीसांनी ६,८६५/- रुपयांच्या देशी-विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. संशयित आरोपी रोशन रविंद्र घाग (वय ३५, रा. सोनगाव, ता. खेड) याच्याविरोधात रत्नागिरी येथील पोलीस अधिक्षक कार्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार प्रविण कृष्णा खांबे यांनी येथील पोलीस स्थानकान फिर्याद दाखल केल्यानुसार, खेड पोलिसांनी संशयित आरोपी रोशन रविंद्र घाग याच्याविरोधात गुन्हा रजि. न. ३७३/२०२५, महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी रोशन रविंद्र घाग याने ओल्ड मंक कंपनीच्या विदेशी दारुच्या १९३५/- रुपयांच्या १८० मिली मापाच्या ९ काचेच्या बाटल्या., मॅकडॉल नं. १ कंपनीच्या विदेशी दारुच्या १५४०/- रुपयांच्या १८० मिली मापाच्या ७ बाटल्या., रॉयल स्टॅग कंपनीच्या विदेशी दारुच्या २७५०/- रुपयांच्या १८० मिली मापाच्या ११ काचेच्या बाटल्या., जी.एम. संत्रा कंपनीच्या देशी दारूच्या ३२०/- रुपयांच्या १८० मिली मापाच्या ४ प्लास्टिकच्या बाटल्या आणि टॅन्गो पंच कंपनीच्या देशी दारुच्या ३२०/- रुपयांच्या १८० मिली मापाच्या ४ प्लाटिकच्या बाटल्या अशा ६,८६५/- रुपयांच्या देशी-विदेशी दारुच्या बाटल्या गैरकायदा बिगरपर‌वाना आपल्या ताबे कब्जात बाळगलेल्या स्थितीत मिळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg