loader
Breaking News
Breaking News
Foto

अंजनवेल केंद्राच्या केंद्रीय क्रीडा स्पर्धा उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न

वरवेली (गणेश किर्वे) - रत्नागिरी जिल्हा परिषद अंतर्गत अंजनवेल केंद्रस्तरीय हिवाळी क्रीडा स्पर्धा अंजनवेल केंद्राच्या केंद्रप्रमुख आरोही शिगवण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा वेलदूर घरटवाडी क्रीडा नगरीमध्ये संपन्न झाल्या. केंद्रप्रमुख आरोही शिगवण मॅडम व मान्यवर यांच्या शुभहस्ते दीपप्रज्वलन व महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. त्यावेळी केंद्रीय क्रीडा समिती अध्यक्ष डॉ मनोज पाटील क्रीडा समिती, सचिव रमेश शिंदे, उपसरपंच राजू शेठ जावळे, ग्रामपंचायत सदस्य मारुती रोहिलकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष राजेश जावळे, केंद्र मुख्याध्यापक निलेश खामकर, मुख्याध्यापक रमेश शिंदे, गणेश विचारे, समीर बामणे, अण्णासाहेब शिंदे, निलेश पाटील, अवधूत राऊतराव, बलशेठवार, केंद्रातील सर्व शिक्षक वृंद शाळा व्यवस्थापन समिती पदाधिकारी ग्रामस्थ महिला बहुसंख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मुख्याध्यापक रमेश शिंदे यांच्या शुभहस्ते सर्व मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. क्रीडा ध्वजाचे ध्वजारोहण केंद्रप्रमुख आरोही शिगवण यांचे शुभ हस्ते तर क्रीडा ज्योतीचे प्रज्वलन उपसरपंच राजेश जावळे यांचे शुभ हस्ते करण्यात आले. केंद्रातील सर्व शाळांच्या सहभागाने क्रीडाज्योत संचलन करण्यात आले.सदर क्रीडा स्पर्धेसाठी पालक,ग्रामस्थांकडून कबड्डी, खोखो, लंगडी, लांब उडी, उंच उडी, गोळाफेक, थाळी फेक, धावणे, उंच उडी इत्यादी क्रीडा प्रकारांसाठी चांगल्या प्रकारची मैदाने तयार करण्यात आलेली होती. उद्घाटन सामन्याचे उद्घाटन उपसरपंच राजेश जावळे यांनी श्रीफळ वाढवून केले. केंद्रप्रमुख आरोही शिगवण यांनी क्रीडा स्पर्धेसाठी लागणारी सर्व चषक तर डॉ मनोज पाटील यांनी सर्वसाधारण विजेतेपदाचे चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी दिली.

टाइम्स स्पेशल

घरटवाडी महिला वर्गाने भोजनाची व्यवस्था केली. सकाळी नऊ वाजता प्रमुख अतिथींच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा अत्यंत उत्साह पूर्ण वातावरणात संपन्न झाला. त्यावेळी बोलताना केंद्रप्रमुख आरोही शिगवण म्हणाले स्पर्धेच्या या युगात सातत्यपूर्ण सरावामुळेच सुयश प्राप्त होते, सर्व विद्यार्थ्यांनी नियमाचे पालन करून आपला खेळ खिलाडी वृत्तीने दाखवावा, खेळाला आता चांगले दिवस आले आहेत. क्रीडा स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल त्याने सर्वांना धन्यवाद दिले. सर्व विजेते व उपविजेते संघांना व वैयक्तिक क्रीडा प्रकारातील विजेते उपविजेते स्पर्धकांना चषक व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी केंद्रातील सर्व शिक्षक प्रयत्नशील होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभू हंबर्डे तर बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश आंधळे यांनी केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg