loader
Breaking News
Breaking News
Foto

राज्यस्तरावर रत्नागिरी जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मंडणगड तालुक्यातील अडखळ शाळेच्या शिक्षक आनंद सुतार यांना

मंडणगड (शशिकांत राऊत) : राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांच्या वतीने आयोजित शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते, त्या स्पर्धेमध्ये "शैक्षणिक साहित्य निर्मिती" या स्पर्धेमध्ये मंडणगड तालुक्यातील अडखळ शाळेतील उपशिक्षक आणि तालुक्यातील एक उपक्रमशील शिक्षक आनंद पांडुरंग सुतार यांनी तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून विभाग स्तरावर तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव उंचावले आहे. सातारा येथे संपन्न झालेल्या विभाग स्तरावरिल एकूण 47 स्पर्धकांमधून "मानवी अस्थिसंस्था आणि आंतररिंद्रिये"या त्यांनी तयार केलेल्या शैक्षणिक साहित्याला परीक्षकांच्या पसंतीने प्राधान्यक्रम मिळाला आणि त्यांची राज्यस्तरावर सादरीकरणासाठी निवड झाली आहे. ही तालुक्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आनंद सुतार यांनी आजपर्यंत 2004 ते 2025 या शैक्षणिक वर्षांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये एकूण 31 वेळा प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावलेले असून अनेक वेळा त्यांची राज्यस्तरावर निवड झालेली आहे. त्यामध्ये लोकसंख्या शिक्षण आणि शैक्षणिक साहित्य निर्मिती यामध्ये त्यांनी नाविन्यपूर्ण शैक्षणिक साहित्य तयार करून समाजाला जागृत करण्यासाठी मोलाचे कार्य केलेले आहे. एड्स जनजागृती, क्षयरोग जनजागृती, कर्करोग जनजागृती, योगा व महत्त्व अंधश्रद्धा निर्मूलन, विविध शासकीय योजना, माध्यमांचे दुष्परिणाम अशा विविध लोकशिक्षणावर आधारित त्यांनी शैक्षणिक साहित्य तयार करून उत्कृष्ट सादरीकरण आजपर्यंत केलेले आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी गणित, विज्ञान भाषा अशा अनेक विषयांवर शैक्षणिक साहित्य तयार करून त्यांनी तालुक्याचे नाव जिल्हास्तरावर तसेच राज्यस्तरावर उंचावलेले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg