loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडचे उपनगराध्यक्ष सतीश चिकणे यांना राज्यस्तरीय छ. शिवाजी महाराज क्रीडा भूषण पुरस्कार जाहीर

खेड : क्रीडा क्षेत्रात गेली दोन दशके सातत्याने उल्लेखनीय कार्य करत विविध स्तरावरील स्पर्धांचे यशस्वी आयोजन, खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देणे तसेच सामाजिक व प्रशासकीय जबाबदा-यांमधून क्रीडाविकासाला चालना देणारे खेडचे उपनगराध्यक्ष सतीश उर्फ पप्पू गणपत चिकणे यांना प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा भूषण पुरस्कार २०२६ जाहीर झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त दिशाः महाराष्ट्राची या संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा राज्यस्तरीय सन्मान सोहोळा आयोजित करण्यात आला असून, त्यामध्ये क्रीडा क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल चिकणे यांची निवड करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा सन्मान सोहोळा आज रविवार दि. २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १०.३० ते दुपारी ३.३० या वेळेत खंड, रत्नागिरी येथे पार पडणार आहे. सतीश उर्फ पप्पू चिकणे यांनी २००५ पासून क्रीडा क्षेत्रात स्पर्धा आयोजनाची भक्कम परंपरा निर्माण केली. त्यांनी २००५ मध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा, २००७ मध्ये राज्यस्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धा निवड चाचणी, २००९ मध्ये जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा तसेच जिल्हास्तरीय बॉडीबिल्डिंग स्पर्धा यांचे यशस्वी आयोजन केले. या सर्व स्पर्धा गुरुवर्य व ग. रा. चिकणे गुरुजी प्रतिष्ठान, खेड यांच्या माध्यमातून पार पडल्या.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg