loader
Breaking News
Breaking News
Foto

साखरपा - देवरुख मार्गांवर ट्रकला अपघात, चालक जखमी

देवळे (प्रकाश चाळके) - संगमेश्वर तालुक्यातील कोंडगावपासून एक किलोमीटर अंतरावर साखरपा-देवरुख रस्त्यावर चौदा चाकी ट्रक रस्त्याच्या कडेच्या डोंगराला धडकून झालेल्या अपघातात चालक जखमी झाला असल्याची घटना दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास घडली. मिळालेल्या माहितीनुसार हनुमंत विठ्ठल शिंगटे वय (४६) हा आपल्या ताब्यातील रिकामा ट्रक क्र. यू पी ३५ ए टी १२९२ देवरुख मार्गावरून कोल्हापूरकडे जात असताना ट्रॅकवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या डोंगराला धडकला, यात चालक ट्रकमध्येच अडकला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या अपघाताचे वृत्त समजताच देवरुखचे पोलीस निरीक्षक उदय झावरे, साखरपा पोलीस दूर क्षेत्राचे पोलीस उप निरीक्षक प्रमोद वाघाटे, सहाय्यक पोलीस फौंजदार शांताराम पंदेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कामेरकर यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचायत समिती सदस्य विद्यासागर तांदळे, ग्रामस्थ पारस साखरे, अंकुश सुर्वे, साहिल चव्हाण, मुरलीधर पांचाळ या ग्रामस्थांच्या मदतीने व रवी इम्फ्रा कंपनीच्या हायड्रा मशीनच्या साहाय्याने जखमी चालक हनुमंत शिंगटे याला बाहेर काढले व त्याला साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करून त्याच्यावर उपचार करण्यात आले. या ट्रक अपघाताबाबत पुढील तपास साखरपा पोलीस करत असून योग्य ती पोलीस कार्यवाही सुरु आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg